घरमुंबईअधिवेशनात आबांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष - प्रकाश गजभिजे

अधिवेशनात आबांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष – प्रकाश गजभिजे

Subscribe

माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या स्मारकाकडे चालू अधिवेशनातही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

अधिवेशनेच्या पहिल्या दिवशी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे दादर, मुंबई येथे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटीची तरतूद केली आहे. अधिवेशनात राज्यापाला याचा उल्लेख केला होता. विधान परिक्षद सभागृहात मुख्यमंत्री यांनी माजी गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील (आबा) यांचे स्मारक उभारले जाणार यांची घोषणा केली होती. परंतू त्या घोषणेचा विसर सरकारला पडला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश गजभिजे यांनी केला आहे.

गेल्या अधिवेशनात घोषणा

माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील हे महाराष्ट्राला धर्मनिरपेक्ष आणि समतेच्या विचारांना गती देणारे मंत्री होते. तसेच ते वेगवेगळ्या पदांवर महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. अशी कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी मुंबईमधील मरिन ड्राईव्ह पोलीस जिमखान्याच्या परिसरात आबांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश गजभिजे यांनी गेल्या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये त्यांना उचलून ठरल होत.

- Advertisement -

सरकार उदासिन

स्व. आर. आर. पाटील हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, डान्सबार बंदी, गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कार्य केले आहे. राज्याचे ग्रामविगकासमंत्री, स्वच्छता मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पाणी पुरवठा अशा वेगवेगळ्या पदांवर महत्वपूर्ण कामगिरी केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे स्मारक उभारणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून स्मारक बांधण्याबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केले होते. भाजप-शिवसेना युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मारकाचा उल्लेख होईल असे वाटले होते. मात्र सरकारच्या उदासिनतेमुळे स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे, असे आरोप प्रकाश गजभिजे यांनी सत्ताधाऱ्यांवर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -