घरताज्या घडामोडीBMC Action : मुंबई पालिकेची ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई, अनधिकृत बांधकाम पाडलं

BMC Action : मुंबई पालिकेची ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई, अनधिकृत बांधकाम पाडलं

Subscribe

राज्यात मुंबई महापालिकेच्या (BMC) भ्रष्टाचाराचं प्रकरण चर्चेत आहे. कोरोना काळात (Covid 19) झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एसआयटी स्थापन करून या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी ठाकरे गटाचे सचिव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या शाखा सरकारच्या निशाण्यावर आल्या आहेत. वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेने थेट बुलडोझर चालवला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोकळ्या जागेवर ठाकरे गटाकडून अनधिकृत कार्यालय बांधण्यात आलं होतं. ही शाखा ४० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ही शाखा मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. दरम्यान ही कारवाईकरून सरकार जाणूनबुजून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, ठाकरे गटाकडून केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisement -

एकाएकी तोडफोड? हे वैरभावनेचे द्योतक – खासदार अरविंद सावंत

महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर आहे. त्यामुळे हे कार्यालय काल बांधलेलं नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, पण एकाएकी तोडफोड? हे वैरभावनेचे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

- Advertisement -

 सुजीत पाटकरांच्या मालमत्तांवर EDची छापेमारी

मुंबई महापालिकेतील (BMC) कोविड घोटाळ्यासंबंधित (Covid Center) मुंबईत ईडीकडून (ED) छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाइफलाइन कंपनीच्या (Lifeline Company) घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून छापेमारी सुरू आहे.


हेही वाचा : राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांच्या मालमत्तांवर EDची छापेमारी, नेमकं प्रकरण काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -