घरक्राइमBMC Covid Center scam : संजीव जयस्वालविरोधात लूकआऊट सर्क्युलर! पत्नीसह श्रीलंकेला जाण्यास...

BMC Covid Center scam : संजीव जयस्वालविरोधात लूकआऊट सर्क्युलर! पत्नीसह श्रीलंकेला जाण्यास रोखले

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणाची तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ED) माजी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे. त्यांच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी केले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या आठवड्यात ते पत्नीसह श्रीलंकेत जाण्यासाठी निघाले असता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना रोखण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांना आज, गुरुवारी अटक केली.

संशयित किंवा आरोपी किंवा सरकारी एजन्सीकडून सुरू असलेल्या तपासाशी संबंधित व्यक्ती देशाबाहेर जात असेल तर, त्याला रोखण्यासाठी लूकआऊट सर्क्युलर जारी केले जाते. संजीव जयस्वाल हे विमानाने जाण्याच्या तयारीत होते आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात परवानगी घेतली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र तरीही त्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या संजीव जयस्वाल यांची ईडीने गेल्या महिन्यात सहा तासांहून अधिक काळ चौकशी करून त्यांचा जबाबही नोंदवला आहे.

- Advertisement -

(सविस्तर वृत्त लवकरच)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -