घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : वंचितकडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी...

Lok Sabha Election 2024 : वंचितकडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द; हे आहे कारण

Subscribe

मुंबई / अकोला – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे. तिथे उमेदवार न देण्याचे धोरण पक्षाने ठरवले. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

काय आहे बांदल यांच्या उमेदवारी रद्दचे कारण 

वंचित बहुजन आघाडीने चार दिवसांपूर्वीच शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर दोन दिवसांनीच मंगलदास बांदल यांनी इंदापूर दौऱ्यावर सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. वंचितच्या उमेदवाराची देवेंद्र फडणवीसांसोबत असलेली जवळीक यामुळे काँग्रेस आणि विरोधकांकडून वंचितच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.

- Advertisement -
Mangaldas Bandal
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल 2 एप्रिल रोजी उमेदवारी जाहीर केली होती. चार दिवसांत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली

देवेंद्र फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. दशरथ माने हे गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहे. त्यांच्याच निवासस्थानी फडणवीस गेल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. माने आणि फडणवीस यांच्या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शिरुरचे उमेदवार मंगलदास बांदल देखील उपस्थित होते. या भेटीचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर बांदल यांना भाजपनेच वंचितमध्ये पाठवले असल्याचे आरोप विरोधकांकडून केले गेले.

व्हायरल होत असलेले फोटो आणि भेटीवर मंगलदास बांदल म्हणाले होते की, दशरथ माने हे जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे नेते आहेत. मी त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो, तेव्हाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले. फडणवीसांच्या भेटीसाठी मी गेलो नव्हतो, असे स्पष्टीकरण बांदल यांनी दिले होते. बारामतीमध्ये वंचितने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्यामुळे वंचितचा शिरुरमधील उमेदवार म्हणून फडणवीसांची भेट घेण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे बांदल यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बांदल आणि फडणवीस भेटीवरुन वंचितवर निशाणा साधला होता. उमेदवारीच्या आदल्या दिवशीही बांदल हे सागर बंगल्यावर गेले होते, असा आरोप पटोले यांनी केला होता.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : पहिल्या तीन टप्प्यात भाजपची फक्त एका जागेवर ठाकरे गटाविरोधात लढत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -