घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरBuldhana Bus Accident : समृध्दी महामार्गावरील अपघातामुळे अजित पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द!

Buldhana Bus Accident : समृध्दी महामार्गावरील अपघातामुळे अजित पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द!

Subscribe

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला.

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. या अपघाताची देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आजचे कार्यक्रम रद्द केले आहेत. (Buldhana Bus Accident Today program of Ajit Pawar canceled due to accident on Samrudhi highway vvp96)

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“समृध्दी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा झालेला मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर राज्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अशा दुःखद मनस्थितीत कुठल्याही जाहीर कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य नसल्याने मी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मृतांना अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

समृध्दी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन 25 प्रवासी मृत्यू पावल्याच्या दुर्घटनेबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. समृध्दी महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

नेमका कसा झाला अपघात?

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आणि 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच, 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही आग इतकी भीषण होती की, या आगीत बस जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस नागपूरहून काल दुपारी 4 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून 33 प्रवासी प्रवास करत होते. रात्री 1 ते दीडच्या सुमारास समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. बस खांबाला धडकल्यानंतर दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे दरवाजामधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले, मात्र इतर प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने अचानक पेट घेतला.

वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार

“कोणत्याही बसमधील प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी बस चालकाची असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजं, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही बाबतीत ते घडताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांना कंट्रोल करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा याठिकाणी लावली जाईल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -