सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन, बैलगाडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Bullock cart race organized for the first time after the Supreme Court verdict, spontaneous response of bullock cart lovers

सुप्रिम कोर्टाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर महाराष्ट्र सर्व प्रथम बैलगाडा शर्यत लांडेवाडी-चिंचोडी येथे १ जानेवारी रोजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडा शर्यतीला येणाऱ्या बैलगाडा मालकास टोकण नंबर घेणे बंधनकारक केले होते. त्या निमित्ताने गुरुवारी तब्बल ७०३ रेकॉर्डब्रेक टोकनची नोंद झाली. यावेळी सकाळ पासूनच मोठया संख्येने बैलगाडा मालक टोकण घेण्यासाठी जमले होते. संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.

बैलगाडा शर्यत ही मावळा मधील गावांची परंपरा आहे काही वर्ष ही परंपरा कोर्टांने बंदी घातल्या मुळे बंद पडली होती आता ती पुन्हा चालू होत आहे या बद्दल आम्हाला आनंद आहे. बैलगाडा शर्यत चालू होत असताना सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या अटी,शर्थी यांची पायमल्ली होणार नाही याची काळजी बैलगाडा मालक आणी आयोजक यांनी घेण्याचे आवाहन केलं आहे. कारण निष्काळजीपणामुळे जर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमांची पायमल्ली झाली तर बैलगाडा शर्यत पुन्हा बंद होऊ शकते ?

त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून शर्यतीत सर्वांनी उत्साहात सहभागी व्हावे. तसेच बैलगाडा शर्यतीची परंपरा टिकवावी, वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. लांडेवाडी येथे १ जानेवारी रोजी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी “ मुंबई डबेवाला असोशिएन” चे शिष्टमंडळ जाणार व बैलगाडा शर्यत चालू व्हावी म्हणुन यशस्वी लढा देणारे खासदार शिवाजी आढळराव-पाटील देखील उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा : corona Virus : नेतेच ठरताहेत सुपर स्प्रेडर