घरताज्या घडामोडीBullock Cart Race : अखेर ग्रामीण महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला ; जाणून...

Bullock Cart Race : अखेर ग्रामीण महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला ; जाणून घ्या, काय आहे ‘बैलगाडा शर्यत’

Subscribe

तामिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवावी यासाठी राज्य सरकार आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनानी सुप्रिम कोर्टात फेरयाचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुप्रिम कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणीनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे.७ वर्षानंतर महाराष्ट्रातील जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील मातीत भंडाराची उधळण करत ही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होत असल्यामुळे बैलगाडा मालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

असा आहे बैलगाडा शर्यतीच्या बंदीचा घटनाक्रम…

  • संरक्षण प्राणी या यादीत २०११ मध्ये बैल या प्राण्याचा समावेश करण्यात आला.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या यादीचा आधार घेत संप्टेंबर २०११ मध्ये या शर्यतीवर बंदी घातली.
  • मात्र ही शर्यत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे २०१२ मध्ये बैलगाडा चालक-मालक संघटनेने उच्च न्यायालयात बंदी हटवण्यासाठी याचिका दाखल केली असता उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली त्यामुळे बैलगाडा संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियम आणि अटींचे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवले असता,या परिपत्रकाचा स्वीकार करत या शर्यतीला काही शर्थींवर परवानगी देण्यात आली आहे.मात्र २०१४ च्या सुनावणीत बैलांचा छळ होत असल्याचे निदर्शनास आणत भारतातील बैलांच्या सर्व खेळांवर बंदी घालण्यात आली.
  • मात्र तामिळनाडू होणाऱ्या जल्लीकट्टू चाहत्यांनी २०१७ मध्ये आंदोलन पुकारत यासाठी तामिळनाडू सरकारने स्वतंत्र कायदा पारित केला.जलिकट्टू हा तामिळनाडू आणि कर्नाटकातील पारंपारिक उत्सव आहे.
  • तामिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवावे यासाठी प्रयत्न सुरु झाले.त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही २०१७ मध्ये नवा कायदा आणला.मात्र या नव्या कायद्याला पेटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.२०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले असता,आतापर्यंत एकही सुनावणी झाली नाही. PETA या शब्दाचा अर्थ people for the Ethical treatment for animal म्हणजेच प्राण्यांसाठी लढणारी संस्था होय.प्राण्यांचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये,यासाठी ही संस्था काम करते.
  • त्यामुळे २०२१ मध्ये बैलगाडा संघटनांनी आंदोलनं केली.त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आज १६ डिसेंबर २०२१ रोजी सुप्रिम कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणीनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे.

 

- Advertisement -

काय आहे बैलगाडा शर्यत ?

बैलगाडा शर्यत ही आंबेगाव,हवेली,जुन्नर,मावळ शिरुर तालुक्यातील यात्रांचे वैभव आहे.गावच्या ग्रामदेवतेचे यात्रेमध्ये धार्मिक व संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा हा खेळ असून, हा एक मातीतल्या रांगड्या गड्यांचा खेळ आहे.या खेळाला १०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे.बैलगाडा म्हणजे २० ते २५ किलो वजनाचा सांगडा.बैलगाडा शर्यतीमध्ये गाड्यावर माणूस स्वार होत नाही. बैलगाडा धावण्यासाठी असलेल्या धावपट्टीला घाट असे म्हणतात.या घाटाची लांबी १०० ते १५० कीमी इतकी असते.बैलगाडा घाटातून धावत असाताना संयोजक त्यांचे सेकंद मोजतात आणि या सेकंदावर बैलगाड्यांचा क्रमांक ठरवला जातो.उदा.१२ सेकंद पहिला ,१५ सेकंद पहिला अशाप्रकारे क्रमांक ठरवले जातात.मात्र, बैलगाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण कारागीर बेरोजगार झाले आहेत.


 ह ही वाचा – Bullock Cart Race: बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -