घरक्राइमBhushan Patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या भावाला अटक; पुणे पोलिसांकडून कारवाई

Bhushan Patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या भावाला अटक; पुणे पोलिसांकडून कारवाई

Subscribe

पुणे : ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्यासह तीन आरोपींच्या नाशिक येथील घरावर छापा टाकला होता. पोलिसांनी या छाप्यात पेन ड्राईव्ह आणि मोबाइल संच जप्त केले असून मोबाइलमधील माहितीचे विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती न्यायालयात दिली होती. दरम्यान, आता ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. (Bhushan Patil Brother of drug trafficker Lalit Patil arrested Action by Pune Police)

हेही वाचा – …तर शिवाजी पार्कसाठी परवानगी घ्यायला एक सेकंदही लागणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे वक्तव्य

- Advertisement -

ससून अंमली पदार्थ विक्री प्रकरणात सुभाष मंडल (29, झारखंड) आणि ससून रुग्णालयातील कँटिनचा कर्मचारी रौफ रहीम शेख (19) यांना अटक करण्यात आली होती. तसेच ललित पाटीलला पुण्याबाहेर जाण्यासाठी मदत करणाऱ्या कारचालक दत्ता डोकेलाही पोलिसांनी अटक केली होती. दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपींनी ललित पाटीलच्या मदतीने इतर कोणाला अंमली पदार्थ विकले आहेत का? याचा तपास करणे, तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अटक करण्यात आरोपीचा तपास करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला होती. त्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. तसेच ललिलत पाटीलचा भाऊ भूषण पाटील (नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात सोमवारी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, शिंदे गटाची माघार; काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, ललीत पाटील हा ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत होता आणि त्याचा भाऊ भूषण पाटील त्याला मदत करत होता तर, बलकवडे हा भूषणचा साथीदार आहे. हे तिघे फरार होते. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके तैनात केली आहेत. ललित पाटील फरार झाल्यापासून आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांचा सुगावा पोलिसांना लागला नाही. मात्र पुणे पोलिसांनी आज सुभाष पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -