घरमहाराष्ट्रOnion Export : आपला एक मुद्दा संपला याचं विरोधकांना दु:ख; देवेंद्र फडणवीसांचा...

Onion Export : आपला एक मुद्दा संपला याचं विरोधकांना दु:ख; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Subscribe

केंद्र सरकारने कांदा निर्यात संदर्भात मोठा निर्णय घेतल्यानंतरही विरोधकांकडून टीका होत आहे, याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने गुजरातमधून 2 हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अशातच आता केंद्र सरकारने कांदा निर्यात संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतरही विरोधक टीका करताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. (Central Government onions export allowing opponents Criticism Devendra Fadnavis strong response)

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कांदा निर्यातबंदी झाल्यानंतरही केंद्र सरकारने सातत्याने कांद्याची खरेदी केली. दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातील परवानगी देखील दिली. यानंतर आता खूप मोठी परवानगी दिली आहे. विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही आहे. आपला एक मुद्दा संपला याचं दु:ख आहे. शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही, याचं दु:ख आहे. शेतकऱ्यांचा आता कांदा निर्यात होणार आहे, यासाठी विरोधकांनी आनंद व्यक्त करायला हवा होता. पण ते आनंद व्यक्त न करता दु:ख व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

केंद्र सरकारने गुजरातमधून 2 हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली असून 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांना कांदा निर्यातीमुळे चांगला दर मिळू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – Onion Export : आपला एक मुद्दा संपला याचं विरोधकांना दु:ख; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -