घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाशिंबे - भालवणी विभागाचे दुहेरीकरण पूर्ण केले

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाशिंबे – भालवणी विभागाचे दुहेरीकरण पूर्ण केले

Subscribe

रेल्वे संरक्षा आयुक्त, सेंट्रल सर्कल, मुंबई यांनी दि. २६.१०.२०२१ आणि २७.१०.२०२१ रोजी सोलापूर विभागातील वाशिंबे आणि भालवणी स्थानकांदरम्यान नव्याने बांधलेल्या दुहेरी मार्गाचे निरीक्षण केले. वाशिंबे-भालवणी विभागातील २६.३३ किलोमीटरचे दुहेरीकरण हे दौंड-गुलबर्गा दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. या दुहेरीकरणाच्या कामात ६५ पूल (एक महत्त्वाचे आणि २ मोठे पूल), जेऊर, पोफलाज आणि वाशिंबे येथे ३ नवीन स्टेशन इमारती आणि ४ स्टेशनवर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा समावेश आहे. रेल्वे संरक्षा आयुक्त यांनी सर्व संरक्षा आणि संरक्षितते संबंधित बाबी, विद्युतीकरण आणि सिग्नलिंग कामांची तपासणी केली.

हा विभाग सुरू झाल्यामुळे, पोफळज स्थानकावरील एक मोठी अडचण दूर झाली आहे. सुवर्ण चतुष्कोनातील एकेरी मार्गावरून क्रॉसिंग करताना गाड्या रीवर्स केल्या जात होत्या त्याची आता आवश्यकता नसेल. यामुळे गाड्यांचा वेग आणखी वाढेल आणि प्रवासाचा वेळ बराच कमी होईल आणि अधिक गाड्या चालवता येतील. ट्रायल रननंतर, 01020 ही अप दिशेने आणि 01019 ही डाउन दिशेने पहिली ट्रेन होती

- Advertisement -

या दुहेरीकरण प्रकल्पामुळे आजूबाजूच्या दौंड तालुका, करमाळा तालुका आदी भाग विकसित होण्याची शक्यता आहे.  अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले की, या विभागाच्या दुहेरीकरणामुळे परीचालनातील एक मोठी अडचण दूर होण्यास मदत झाली आहे. पाहणी दरम्यान सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक  शैलेश गुप्ता, शाखा अधिकारी आणि रेल्वे विकास निगम लिमिटेडचे ​​अधिकारी देखील आयुक्त रेल्वे सुरक्षा सोबत होते. तपासणीदरम्यान सर्व कोविड-19 प्रोटोकॉलचे निरीक्षण करण्यात आले.


हेही वाचा – ST Workers Strike: एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर, पडळकर म्हणतात कारवाई केली तर..

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -