घरमहाराष्ट्रपुण्यात बनावट नियुक्तीपत्रे देत घातला ३५ लाखाचा गंडा

पुण्यात बनावट नियुक्तीपत्रे देत घातला ३५ लाखाचा गंडा

Subscribe

बनावट नियुक्तपत्रे देऊन ३५ लाखाचा गंडा घातल्याची घटना पुण्यामध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेरोजगार इसमांना नोकरीचे आमिष दाखवून, त्याच्याकडील कागदपत्रे प्राप्त करून त्या कागदपत्रांचा गैरवापर करून चार इसमांना ३५ लाखांचा गंडा घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुण्यातील पेबल्स येथे राहणाऱ्या संजय मधुकर माळवदे, सपना संजय माळवदे, रितेश संजय माळवदे या आरोपींना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील पेबल्स येथे राहणाऱ्या तीन आरोपींनी चार इसमांना महावितरणाच्या कल्याणमधील कार्यालयामध्ये आणि खासगी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून मुकुंद चव्हाण, रेवन काटकर, दिगंबर चिन्ने, भाऊ शिंदे या चौघांनी मिळून त्या तिघांना एकूण ३५ लाख २५ हजारांची रक्कम जमा करुन दिली. त्यानंतर आरोपींनी मुकुंद चव्हाण, रेवन काटकर, दिगंबर चिन्ने आणि शिंदे यांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. आपल्याला नोकरी मिळाली यामुळे हे चौघेही खूप खुश होते. त्यानंतर हे चौघेही आपली नियुक्तपत्रे घेऊन कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी देण्यात आलेली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंजवडी पोलिसात धाव घेत याप्रकरणी संजय मधुकर माळवदे, सपना संजय माळवदे, रितेश संजय माळवदे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वाचा – नोकरीचे आमिष दाखवत ५९ हजाराला गंडा

वाचा – कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -