घरमुंबईनोकरीचे आमिष दाखवत ५९ हजाराला गंडा

नोकरीचे आमिष दाखवत ५९ हजाराला गंडा

Subscribe

नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ५९ हजारांचा मोबाईल खरेदी करत गंडा घातल्याची घटना अंबरनाथमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एका बेरोजगार इसमाला नोकरीचे आमिष दाखवून, त्याच्याकडील कागदपत्रे प्राप्त करून त्या कागदपत्रांचा गैरवापर करून दोन इसमांनी ई एम आयवर सॅमसंग नोट ९ हा महागडा मोबाईल खरेदी करत ५९ हजाराला गंडा घातल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

अंबरनाथ येथील नवरेनगर परिसरात दिलीप पठाणी ( ५८) हे राहतात. दिलीपला यांना नोकरी नसल्यामुळे ते नोकरीच्या शोधात होते. ३ महिन्यांपूर्वी ते अंबरनाथ येथील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास आले असता त्यांची ओळख रोहित गोस्वामी यांच्याशी झाली. यावेळी दिलीपने रोहितला माझ्यासाठी देखील रिलायन्स कंपनीत नोकरी बघ असे सांगितले. त्यावेळी उल्हासनगर – २ येथे सोनारगल्ली येथे रिलायन्सचे नवीन शोरूम उघडणार आहे. तेथे तुला मी नोकरी मिळवून देईल असे रोहितने सांगितले. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट फोटो, बँक पासबुकचे झेरॉक्स आवश्यक आहेत ते मला आणून दे असेही रोहितने दिलीप यांना सांगितले. रोहितच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दिलीपने रोहितला सर्व कागदपत्रे दिले.

- Advertisement -

अशी केली फसवणूक

ही सर्व कागदपत्रे घेऊन रोहित दिलीपला रिलायन्स डिजिटल या इलेक्ट्रॉनिक सामानाच्या शोरूम मध्ये घेऊन गेला. ‘तुला मी मोबाईल घेऊन देतो’, असे रोहित दिलीपला म्हणाला, तेव्हा ‘मला मोबाईल नको नोकरी हवी’ असे दिलीपने सांगितले. यावर कंपनी मोबाईलचे पैसे देणार असल्याचे रोहितने सांगितले. शोरूम मधील बजाज फायनान्स कंपनीच्या काऊंटरवर दिलीपची कागदपत्रे दिली गेली आणि ५९ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा नोट ९ मोबाईल खरेदी केला. यावेळी १२ हजार रुपये डाऊन पेमेंट रोहितने भरला, मोबाईल मिळाल्यानंतर रोहितने तो दिलीपच्या हातात दिला. दोघेही शोरूमच्या बाहेर आल्यानंतर बाहेर एक इसम उभा होता. रोहितने दिलीपला ईशारा करीत तुमच्या कामाची माहिती मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे. त्यामुळे तो मोबाईल त्याला द्या असे दिलीपला सांगितले, दिलीपने तो मोबाईल त्या इसमाला दिला. त्यानंतर रोहित आणि तो इसम त्याठिकाणाहून फरार झाले. मात्र दर महिन्याला मोबाईलचा ई एम आय दिलीपच्या नावावर जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी दिलीपला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी दिलीपने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी रोहित आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – 156 बेरोजगार तरुणांना 41 लाखांचा गंडा

- Advertisement -

हेही वाचा – मोबाइलवरून क्रेडिट कार्ड, ओटीपी क्रमांक घेऊन तीस हजारांचा गंडा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -