घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरराज ठाकरेंना औरंगाबादची सभा भोवणार? पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

राज ठाकरेंना औरंगाबादची सभा भोवणार? पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

Subscribe

राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यावरून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने सदस्य नोंदणी सुरू केलेली असताना दुसरीकडे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यावरून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.


राज ठाकरे यांनी कामगार दिनानिमित्ताने १ मे रोजी औरंगाबादच्या (Aurangabad) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. या सभेसाठी मनसेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, अखेरच्या क्षणीला अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली. तसेच, आवाजाची मर्यादा आणि गर्दी न जमवम्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मनसेकडून सर्व नियम पायदळी तुडवले गेले. परिणामी या सभेला हजारोंची गर्दी झाली. त्यामुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -


याच सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भाषण केलं. हे भाषण चिथावणीखोर असल्याचाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. सायबर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे फुटेज तपासून गृहमंत्रालयाकडे अहवाल पाठवला होता. याबाबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंवर औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा सक्रीय झाले आहेत. ते पुणे दौऱ्यावर गेले असून आज पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातून मनसेच्या सदस्य नोंदणीला (MNS Member Registration) सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला सदस्य म्हणून राज ठाकरे यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, माझी नोंदणी केल्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो असंही मिश्किलीत राज ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -