घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या 'त्या' एका शब्दावरून सभागृहात मोठा गदारोळ

आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ एका शब्दावरून सभागृहात मोठा गदारोळ

Subscribe

विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू होती. यावेळी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे  यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले. या उत्तरावर विरोधाकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावर ज्येष्ठ सदस्यांसह आदित्य ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले –

- Advertisement -

आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली, आपल्या राष्ट्रपती आदिवसी समाजाच्या आहेत. यावर्षी तरी असे उत्तर अपेक्षित नाही. हे पाप आमचे, तुमचे नाही. जेव्हा आपण आदिवासी भागात जातो, तेव्हा राजकारणी म्हणून आपल्याला तेथील स्थिती पाहून लाज वाटली पाहिजे. ७५ वर्षांपासून ही स्थिती आहे. प्रश्न राखीव ठेवलेला असतानाही कुपोषणामुळे मृत्यू होत नाहीत, असे उत्तर मिळाल्यावर आक्षेप आदित्य ठाकरेंनी घेतला. करोनाचा काळ सुरु असताना काही राज्यांमध्ये, रुग्णालयात करोना झाला तरी सर्दीमुळे, ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगत होते. महाविकास आघाडी सरकार असताना मृत्यूचे निमित्त काही असले तरी कारण कोरोना असल्याचे दाखवले पाहिजे असे स्पष्ट सांगण्यात आले होते. कोरोनाची आकडेवारी कमी करु नका असे निर्देश होते. त्यामुळे कुपोषण नाही असे म्हणणे खोटे आहे,असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या त्या शंब्दावर आक्षेप –

- Advertisement -

यावर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि लाज वाटली पाहिजे वाक्यावर त्यांनी आक्षेप  घेतला. सदस्यांनी संसदीय शब्दांचा वापर करुन आपले मत आणि भावना मांडता येतात. लाज वाटली पाहिजे म्हणजे काय? आपल्याच पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे असे शब्द ते कसे बोलू शकतात? हे आकडे तीन वर्षांतले आहेत, आपले वडील तेव्हा मुख्यमंत्री होते, असे मुनगंटीवार म्हणाले.

जयंत पाटील यांनी केला बचाव –

यानंतर जयंत पाटील उभे राहिले आणि मुनगंटीवार यांनी गैरसमज झाल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरेंनी मंत्र्यांनी ज्यापद्धतीने असंवेदनशील वक्तव्य केले, त्याबद्दल असे म्हटले आहे. सरकारमध्ये गोंधळ सुरु आहे. आरोग्यमंत्र्यांचे आकडे आदिवासी मंत्री बोलून दाखवत आहेत. वनमंत्री आदिवासी मंत्र्यांचे संरक्षण करत आहेत. वनमंत्री, आरोग्यमंत्री यांची नव्हे तर आदिवासी विभागाची जबाबदारी आहे. आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते वक्तव्य मागे घ्या, अशी मागणी केली.

अध्यक्षांचा निर्णय –

यानंतर दोन्हीची नोंदी आम्ही घेतल्या आहेत. महाराष्ट्रा विधानसभेच्या असंसदीय शब्दांची यादी आपल्या कडे आहे. यात नंबर 357 मध्ये हा शब्द असंसदीय म्हणून आपल्या यादीत आहे. त्यामुळे याची माहिती मी सभागृहाला देत आहे. जर हे असंसदीय असेल तर ते रेकॉर्डमधून काढले जाईल, असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -