घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar : कापड दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : कापड दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसारत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुकानाला लागलेल्या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. (Chhatrapati Sambhajinagar Fire breaks out at textile shop Seven people died same family)

हेही वाचा – Ratnagiri-Sindhudurg Constituency : किरण सामंत यांची माघार; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छावणी परिसरातील एका तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या कपडा दुकानाला आग लागली. रात्री जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या किंग स्टाईल टेलर्स या कापड दुकानातील बोर्डला इलेक्ट्रिक बाईकचे चार्जर लावण्यात आले होते. या चार्जराचा स्फोट झाल्याने कपडा दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. मात्र तोपर्यंत एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आग लागलेल्या तीन जमली इमारतीत एकूण 16 जण राहत होते. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू, तर पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. हमीदा बेगम (50), शेख सोहेल (35), वसीम शेख (30), तन्वीर वसीम (23), रेश्मा शेख (22), आसिम वसीम शेख (3) आणि परी वसीम शेख (2) यांचा मृत्यू झाला आहे.  तर आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय घटनास्थळी पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : कापड दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

दरम्यान, कपडा दुकानाला लागलेल्या आगीनंतर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर निशाणा साधताना गंभीर आरोप केले आहेत. कुणाच्या चुकीमुळे 7 लोकांचे मृत्यू झाला, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा आल्या, जवानांकडे टॉर्च नव्हत्या आणि इतर साहित्य नव्हते, असा आरोपही जलील यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -