घरमहाराष्ट्रपुणेWeather Update: पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मराठवाड्यासह 'या' भागांत बरसणार मेघधारा

Weather Update: पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागांत बरसणार मेघधारा

Subscribe

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात पुढचे चार दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई: राज्यासह देशात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमालयीन प्रदेशासह देशाच्या वायव्य भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMDने व्यक्त केला आहे. तर राज्यातील काही भागांत अवकाळीचा इशारा आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. (Maharashtra Weather Update IMD Forecast Unseasonal rain in Konkan Marathwada Centre Maharashtra)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात पुढचे चार दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी पाच एप्रिलपासून पाऊस होण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

‘या’ भागात अवकाळी

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमध्ये एक द्रोणीय रेषा दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत असून जी कर्नटक व मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे राज्यात सर्वत्र पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. याचबरोबर कमाल तापमान हळूहळू दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात व आठ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत उकाडा वाढणार (Mumbai Heat)

मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे आणि दमट वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. घामाच्या धारा आणि ऊन यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईचे तापमान मंगळवारी साधारण 32 डिग्रीवर पोहचलो होते. तर सांताक्रूझ येथील तापमान हे 32.9 डिग्री सेल्सिअस एवढे होते.

- Advertisement -

पुण्यात ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज

पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पुढील पाच दिवस ढगाळ असणार आहे. तर सात आणि आठ तारखेला आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा: Mumbai News : क्लीनअप मार्शलकडून आता डिजीटल पद्धतीने मिळणार दंडाची पावती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -