घरमहाराष्ट्रकोल्हापूर राड्याच्या मुळाशी जाणे गरजेचे, छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केली चिंता

कोल्हापूर राड्याच्या मुळाशी जाणे गरजेचे, छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केली चिंता

Subscribe

कोल्हापुरात ही घटना नेमकी का आणि कशामुळे घडली, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. तर पोलिसांनी यापुढे सतर्क राहावे, असे कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून सांगण्यात आले.

कोल्हापुरात बुधवारी (ता. 07 जून) आक्षेपार्ह पोस्टमुळे वातावरण तापलेले पाहायला मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 36 जणांना ताब्यात घेतले आहे. यांतील 3 जण हे अल्पवयीन असल्याची माहिती कोल्हापुरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून देण्यात आलेली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या खात्याचा भार सांभाळण्यास असमर्थ ठरल्यांने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण या प्रकरणी पहिल्यांदाच छत्रपती शाहू महाराज यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोल्हापुरात ही घटना नेमकी का आणि कशामुळे घडली, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. तर पोलिसांनी यापुढे सतर्क राहावे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – Kolhapur Voilence : शांतात राखा, कोल्हापूर राड्यावरून शरद पवारांचे जनतेला आवाहन

- Advertisement -

कोल्हापुरात आज (ता. 08 जून) छत्रपती शाहू महाराज यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी बुधवारी कोल्हापुरात झालेल्या राड्याविषयी चिंता व्यक्त करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापुरात याआधी ही असे घडले आहे. पण असे भयानक पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन खोल अभ्यास करणे गजरजेचे आहे. या घटनेचा नेहमीप्रमाणे तपास न करता वेगळ्या मार्गाने तपास करण्यात आला पाहिजे. तसेच अशी मानसिकता नेमकी कशी तयार होत आहे, याबाबतचा तपास देखील पोलिसांनी केला पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असते. त्यातही गृह खात्याची सर्वाधिक जबाबदारी असते. त्यामुळे याबाबतचे अहवाल घेऊन पोलिसांनी या घटना पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले आहे. तर याआधी छत्रपती संभाजीनगर, मग अहिल्यानगर अशा ठिकाणी या घटना घडलेल्या आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून या घटनांचे एकमेकांशी काही संबंध आहेत की नाही, हे तपासले पाहिजे.

- Advertisement -

ही जी घटना कोल्हापुरात घडायची ती घडली, पण पोलिसांनी यापुढे अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, सल्ला छत्रपती शाहू महाराज यांनी पोलिसांना दिला आहे. तर माझी कुठे गरज लागली तर मला सांगा मी नक्की उपस्थित राहिन, असे पोलिसांना सांगितले असल्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -