घरताज्या घडामोडीमोठी बातमी! पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

मोठी बातमी! पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा धमकीचा फोन आल्याचे समजते. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे' असे या धमकीच्या फोनमधून सांगण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा धमकीचा फोन आल्याचे समजते. ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’ असे या धमकीच्या फोनमधून सांगण्यात आले. आरोपीने दारुच्या नशेत फोन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली आहे. (Chief Minister Eknath Shinde received a call to the police about death threats)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’ अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या 112 हेल्पलाईन क्रमांकावर आला. त्यावेळी पोलिसांनी या फोनची तापसणी केली असता हा फोन पुण्यातून आल्याचे समजले. पुण्यातील वारजे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा फोन आल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, धमकीच्या फोनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

- Advertisement -

धमकी देण्याचे नेमके कारण काय?

हा व्यक्ती धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्यांची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याच्या पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत. काल रात्री प्रथम त्याने ११२ वर कॉल करून छातीत दुखत असुन एम्ब्युलन्स पाठवा असे कळवले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून माननीय मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्याचा कॉल केला. यानंतर त्याची माहिती घेऊन जेव्हा ताब्यात घेतले गेले तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांना धमकी देण्याचे फोनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते.


हेही वाचा – Supreme Court On Menstrual Hygiene : शालेय मुलींसंबंधी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश, ‘मोफत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -