घर देश-विदेश Taliban Government : शिक्षणानंतर आता महिलांच्या 'खाण्यावरही' बंदी

Taliban Government : शिक्षणानंतर आता महिलांच्या ‘खाण्यावरही’ बंदी

Subscribe

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर मागील एक वर्षापासून महिलांची अवस्था बिकट झाली आहे. तालिबान सरकारने आधी शिक्षणांवर बंदी घातल्यानंतर सोमवारी (10 एप्रिल) अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील उद्यान किंवा हिरव्यागार जागा असलेल्या हॉटेलमध्ये कुटुंब आणि महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मौलवींनी केलेल्या तक्रारीनंतर तालिबान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तक्रारीत म्हटले की, उद्यान आणि हिरव्यागार जागा असलेल्या हॉटेलमध्ये महिला आणि पुरुषांची गर्दी वाढू लागली आहे. महिला हिजाब परिधान न करता आणि स्त्री-पुरुष एकाच ठिकाणी भेटत असल्याने निर्बंध लादण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, ही बंदी फक्त हेरात प्रांतातील हिरवीगार जागा असलेल्या हॉटेलमध्ये लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेरातमधील पुरुषांसाठी सुरू असलेल्या हॉटेलमध्ये महिलांना बाहेरच्या जेवणाची बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र एका इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार हेरातमधील मंत्रालय आणि आचार संचालनालयाचे उप अधिकारी बाज मोहम्मद नझीर यांनी सर्व हॉटेल कुटुंब आणि महिलांसाठी मर्यादित नसल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही फक्त उद्यान किंवा हिरव्यागार जागा असलेल्या हॉटेलमध्ये नियम लागू केले आहेत. जिथे स्त्री आणि पुरुष एकत्र येऊ शकतात. मौलवी आणि सामान्य लोकांच्या वारंवार तक्रारीनंतर आम्ही नियम निश्चित करून महिलांचा हॉटेलमध्ये प्रवेश बंद केला आहे.

तालिबानने आधीच बंदी घातली आहे
हेरातमधील आचार संचालनालयाचे प्रमुख अजीझुररहमान अल मुहाजिर म्हणाले की, एका गार्डनला हॉटेलचे नाव देण्यात आले. जिथे पुरुष आणि स्त्रिया एकत्र भेटत होते. पण देवाचे आभार आता नियम निश्चित झाल्यामुळे हे बंद होईल. आमचे ऑडिटर्स आता सर्व उद्यानांची तपासणी करणार आहेत जिथे महिला आणि पुरुष एकत्र जात होते.

- Advertisement -

तालिबानमध्ये महिलांसाठी ‘या’ गोष्टींवर बंदी
1. गर्भनिरोधक गोळ्या वापरू नये
तालिबानला वाटते की, मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गर्भनिरोधकांचा वापर केला जातो. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन या गोळ्या कोणत्याही परिस्थितीत न वापरण्याचा इशारा दिला आहे. मेडीकल दुकानदारांनाही धमकावण्यात आले असून असे कोणतेही औषध स्टॉकमध्ये ठेवू दिले जात नाही आहे.

2. मुलींच्या शिक्षणावर बंदी
अफगाणिस्तानमधील खासगी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सहाव्या इयत्तेपासून तर विद्यापीठात महिलांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला मुलींना बसण्यास मनाई असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या विद्यापीठावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही तालिबानकडून देण्यात आला आहे. याआधी महिलांना उद्यानात जाण्यास आणि जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

3. माध्यमांमध्ये काम करण्यावर बंदी
अफगाणिस्तानात तालिबान सरकारने माध्यम क्षेत्रातील महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. तालिबानकडून प्रसारमाध्यमांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, पुरुषांसोबत कोणतीही महिला अँकर शो होस्ट करणार नाही आणि कोणत्याही महिला पाहुण्याला शोमध्ये आमंत्रित करू नये.

- Advertisment -