घरमहाराष्ट्रदोन्ही डोस घेतलेल्यांना गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येताना RTPCR नाही - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

दोन्ही डोस घेतलेल्यांना गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येताना RTPCR नाही – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

Subscribe

गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना कोरोना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा. परंतु, १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

शासनाच्‍या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्‍थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्‍या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्‍यावा. जेणेकरुन प्रवासादरम्‍यान तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे.

- Advertisement -

गणेशोत्सव २०२१ साठी महाराष्‍ट्र शासन, गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी ०६२१ /प्र.क्र. 144/विशा 1 ब दिनांक २९ जून २०२१ अन्‍वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव २०२१ चा सण साजरा करण्‍यात यावा असेही यात म्हटले आहे.


उद्वव ठाकरेंना जे करायचयं ते करु दे, मला जे करायचयं ते मी करणार…अटकेनंतर राणेंची प्रतिक्रीया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -