घरताज्या घडामोडीदेशातील सहकार क्षेत्र बंद करण्याचा उद्योग बंद झाला पाहिजे - ...

देशातील सहकार क्षेत्र बंद करण्याचा उद्योग बंद झाला पाहिजे – सुधीर सावंत

Subscribe

समृध्द आनंदी गाव उपक्रमाला जिल्हा बँकेने सहकार्य करावे

सहकार क्षेत्र बंद करण्याचा जो उद्योग देशात सुरू आहे तो बंद झाला पाहीजे.आम्ही समृध्द आनंदी गाव हा विषय घेऊन पुढे जात आहोत त्याला जिल्हा बँकेने सहकार्य करावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा जिल्हा घडू शकतो.गावात रस्ते बांधून पाणी आणून काही होणार नाही. मुळ मुद्दा आहे तो रोजगाराचा व विकासाचा आहे.जिल्ह्यातील तरूण ज्या दिवशी कोकण सोडून बाहेर जाणार नाहीत त्या दिवशी जिल्ह्याचा विकास झाला असे म्हणू शकतो.असे प्रतिपादन जिल्हा बँक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी ओरोस येथे केले. सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत दिले जाणा-या पुरस्कारांचे जिल्हाधिकारी के मंजूलश्मी यांच्या हस्ते बुधवारी ओरोस येथील शरदकृषी भवन सभागृहा मध्ये वितरण करण्यात आले.

जिल्हा बँकेची ३८वी वार्षिक सरवसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.सभेच्या शेवटी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी अध्यक्षीय भाषण केले.व उपस्थित असलेल्या सभासदांच्या प्रश्नांना संपर्कपणे उत्तरे दिली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या साडेसहा वर्षात जे काही काम केलं ते सर्वांसाठी व बँकेसाठी केलॆ. भविष्यात हि बँक या पेशाही चांगेल काम करत महाराष्र्टातच नव्हे तर देशात अग्रणी बँक बनेल.येणा-या निवडणूकीत कसलेही राजकारण न आणता जिल्ह्यातील सहकार वृध्दींगत होण्यासाठी काम केलं जाईल.

बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.शेतकरी व सहकारी संस्था याच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते कोण तेही राजकारण न आणता घेतले जातील.हि बँक सहकार शेत्रात महाराष्ट्रातच नव्हे तर नव्हे तर देशात अग्रेसर रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असा ठाम विश्वास शेवटी सतिश सावंत यांनी व्यक्त केला

- Advertisement -

हेही वाचा – ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले, ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -