घरमहाराष्ट्रशिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा ,प. पू. युवराज म्हणत डिवचले

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा ,प. पू. युवराज म्हणत डिवचले

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यात अधिवेशनाचा पाचवा दिवस विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादविवादामुळे चांगलाच गाजला. यात आज शेवटच्या दिवशी सरकारमधील शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आहे. आज सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांनी ,प. पू. युवराज म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत निशाणा साधला आहे. त्यामुळे आजही विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट व भाजप आमदारांची आदित्य ठाकरेंविरोधात ’50 खोके, मातोश्री ओके’, ‘युवराज दिशा भरकटले’, अशी घोषणाबाजी सत्ताधारी करत आहेत.

- Advertisement -

आंदोलकांनी हातात एक मोठं बॅनर पाहायला मिळत आहे. यावर आदित्य ठाकरेंचा व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. ज्यावर आदित्य ठाकरे गाढवावर उलट्या दिशेने बसलेले दिसले. ज्यावरून आदित्य ठाकरेंची दिशा चुकली, पर्यावरण खातं त्यांनी घरातं राहून सांभाळलं, अशा देण्यात आला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -