घरमहाराष्ट्रकाही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय; मुख्यमंत्र्यांचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय; मुख्यमंत्र्यांचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष काही संपणार नसल्याचं दिसतंय. नारायण राणे (Narayan Rane) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला इशारा दिल्यानंतर आज शिवसेनेने ‘सामना’तून राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता नारायण राणे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. काही जुने व्हायरस परत आले आहेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला.

“अजूनही थोडे दिवस थांबायला पाहिजे, कोरोनाचं संकट खरंच गेलं आहे का? पूर्ण गेलेलं नाही, अजूनही आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आले आहेत. ते पण दिसतंय…आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आह, त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

काही जणांचं राजकीय पर्यटन

मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या जन आशीरव्दा यात्रेवर निशाणा साधला. “सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यंटन असतं इथून तिथे आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती. त्यावेळी एक शब्द वापरला होता ‘रिवेंज टुरीझम’. त्यांचं असं म्हणणं होतं की जरा सावधता बाळगा, पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होत आहे की पुन्हा हे संकट येऊ शकतं,” असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ च्या कार्यक्रमात बोलत होते.


हेही वाचा – राणेंनी त्यांच्या खात्याचा विकास करावा, उगाच शहाणपणा कराल तर..; राऊतांचा इशारा

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -