घरमहाराष्ट्रतुमच्या दलालाने विक्रांतचे पैसे खाल्ले त्याची बाजू घेता; मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा शिवसेना स्टाईल...

तुमच्या दलालाने विक्रांतचे पैसे खाल्ले त्याची बाजू घेता; मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा शिवसेना स्टाईल समाचार

Subscribe

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ऑनलाईन भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच शिवसेना स्टाईलने समाचार घेतला. तुमच्या दलालाने विक्रांतचे पैसे खाल्ले त्याची बाजू घेता, एवढ्या खालपर्यंत गेलात तुम्ही, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या अंगावरती आरोप करताना तुमच्या दलालावरती विक्रांतसाठी जो पैसा गोळा केलात त्यातले पैसे खाल्लेत म्हणून आरोप होत आहेत, त्यांची तुम्ही बाजू घेता.एवढ्या खालपर्यंत गेलात तुम्ही. विक्रांत म्हणजे देशाचा अभिमान. शिवसेना प्रमुखांची ती कल्पना होती ज्या युद्धनौकेतून शत्रुवर हल्ला झाला, त्या विक्रांतचं स्मारक व्हावं. सैनिकांच्या नावाने तुम्ही पैसे खाता. याच्यासारखी शरमेची गोष्ट दुसरी असू शकत नाही. काय म्हणून भाजपला मतं द्यायची,” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

- Advertisement -

राशन दिलं पण ते शिजवायचं कसं?

“काल देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राशन दिलं…राशन दिलं पण ते शिजवायचं कसं? की कच्चं खायचं? तुमची फसवी उज्ज्वला योजना चालू आहे का? पहिलं वाजत गाजत सिलिंडर दिलं आणि आता रिकामं सिलिंडर वाजवायचं कोरोना पळवायला. विक्रांतच्या पैशाने तुम्ही तुमचं राशन भरलं. पण जनतेच्या पैशातून जनतेला राशन दिलं त्याचं श्रेय तुम्ही घेऊ नका. पण दिलेलं राशन शिजवायचं कसं हे सांगा. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये महागाईविषयी काही बोलले का? गॅसच्या किंमती वाढल्यात, पेट्रोलच्या किंमती वाढल्यात, डिझेलच्या किंमती वाढल्यात. वरती काय सांगितलं भाजपशासित राज्यात पेट्रोल-डिझेलचे पैसे कमी केले. म्हणजे आम्ही कमी करत जायचे आणि तुम्ही वाढवत जायचे. आमचे जीएसटीचे पैसे देत नाहीत. का म्हणून द्यायचं भाजपला मत?” असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.

२०१९ मध्ये भाजपनं मतं काँग्रेसला फिरवली

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून वातावरण तापलं आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने भाषण करत भाजपचा समाचार घेतला. २०१९ मधील मतांची आकडेवारी सादर करत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने शिवसेनेसोबत दगा दिल्याचा आरोप केला. २०१९ मध्ये भाजपनं मतं काँग्रेसला फिरवली नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – २०१९ मध्ये भाजपनं मतं काँग्रेसला फिरवली; मुख्यमंत्र्यांनी मतांची आकडेवारी सादर करत भाजपचा घेतला समाचार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -