घरमहाराष्ट्र'या रे माझ्या लेकरांनो 'त्या' चिखलातून बाहेर या'; राज ठाकरेंनी रेखाटलेलं 'ते'...

‘या रे माझ्या लेकरांनो ‘त्या’ चिखलातून बाहेर या’; राज ठाकरेंनी रेखाटलेलं ‘ते’ व्यंगचित्र पुन्हा होतंय व्हायरल

Subscribe

राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवत मनसेने आता पुन्हा तेच पाच वर्षापूर्वीचे व्यंगचित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) वर पोस्ट करण्यात आले असून, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेला कोणते आवाहन करतायेत ते सांगण्यात आले आहे.

मुंबई : सध्या राज्यात आरक्षणाच्या लढाईवरून दोन समाज आमनेसामने उभे ठाकले असल्याचे चित्र काहीअंशी दिसून येत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली असताना दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज 17 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आयोजित सभेतून जरांगे पाटलांवर टीकेचे बाण सोडले. यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईवरून जातीपातीच्या राजकारणात गुरफटते की काय असे चित्र दिसत असतानाच पाच वर्षापूर्वी राज ठाकरेंनी याच जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून सत्ताधाऱ्यांना चिमटे घेतले होते. ते व्यंगचित्र पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. (Come out of that mire my children The Te cartoon drawn by Raj Thackeray is going viral again)

- Advertisement -

राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवत मनसेने आता पुन्हा तेच पाच वर्षापूर्वीचे व्यंगचित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) वर पोस्ट करण्यात आले असून, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेला कोणते आवाहन करतायेत ते सांगण्यात आले आहे.

राज्यातील राजकारणातील उलथापालथीनंतर मागील दोन ते तीन महिन्यांपासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मागणी भोवती फिरताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी दोनवेळा उपोषणं केली आहेत. त्यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिलेला असतानाच आता ओबीसींनी एल्गाराचे हत्यार उपसले आहे. सत्तेत सहभागी असलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आयोजित एल्गार मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याकडूनही प्रत्युत्तर मिळाले असले तरी राज्यातील दोन मोठे समाज एकमेंकासमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे याच जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करणारे व्यंगचित्र मनसेच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून व्हायरल करण्यात आल्याने जातीपातीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पुन्हा एकदा राज ठाकरेंनी टोला मारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आताची गाणी गुणगुणताच येत नाहीत; राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली खंत

व्यंगचित्र पोस्ट करताना काय लिहले?

मनसेने ट्वीटरवर पोस्ट करत लिहले की, राज ठाकरेंनी 27 जानेवारी 2018 चं हे राजकीय व्यंगचित्र… महाराष्ट्रात आज जातीजातींमध्ये जी भांडणं लावली जात आहेत त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून काय म्हणाले असते तो विचार मांडण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून केला आहे. व्यंगचित्र पहा आणि विचार करा ! असे लिहले आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : भुजबळांच्या पवित्र्यामुळे अजित पवार गटाची कोंडी?

काय आहे त्या ट्वीट केलेल्या व्यंगचित्रामध्ये?

पोस्ट करण्यात आलेल्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी जातीपातीचा चिखल दाखवून त्यामध्ये दलित आणि मराठा यांच्या हाती दांडुके दाखवून भांडण करताना दाखवले तर बाजुला व्हाटसअॅप वापरताना ब्राम्हण जातीचे प्रतिनिधीत्व करणारा व्यक्ती रेखाटला आहे. तर दूरवर बिन चेहऱ्यांचे जातीयवादी नेते असे म्हणत काही नेते दाखवले आहेत. तर याच व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटत महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून बोलताना दाखवण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती म्हणतायेत की, ‘ अरे तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो आणि आज तुम्ही एकमेंकांच्या विरोधात लढताय, का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी. या रे माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या असे आवाहन करताना छत्रपती शिवाजी महाराज रेखाटण्यात आले आहेत. सध्या हे व्यंगचित्र पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -