घरपालघरकोर्टाच्या अवमानप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्याला अटक

कोर्टाच्या अवमानप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्याला अटक

Subscribe

खंडणी देण्यास नकार दिल्याने चुरी आणि त्यांच्या साथिदारांनी वणई येथील जागेवर जाऊन मानसिक त्रास दिल्याची तक्रार वृषाली कलाल यांनी केल्यानंतर वाणगाव पोलीस ठाण्यात चुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पालघर: एका महिलेकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्याप्रकरणी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी यांना पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. सुशील चुरी पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती असून सध्या शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुखही आहेत. डहाणू तालुक्यातील वणई येथील जमिनप्रकरणी वृषाली कलाल (रा. पोखरण, ठाणे) यांच्याकडून चुरी यांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्याने चुरी आणि त्यांच्या साथिदारांनी वणई येथील जागेवर जाऊन मानसिक त्रास दिल्याची तक्रार वृषाली कलाल यांनी केल्यानंतर वाणगाव पोलीस ठाण्यात चुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सध्या डहाणू कोर्टात याप्रकरणाचा खटला सुरु आहे. खटल्याची सुनावणी सुरु असतानाही चुरी वारंवार गैरहजर राहत असल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात अखेर अजामिनपात्र वारंट काढले. त्यानंतर वाणगाव पोलिसांनी चुरी यांना अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने चुरी यांची पाच दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -