घरताज्या घडामोडीमराठा आरक्षण: 'भाजपा नेत्यांनी आग लावण्याचा कार्यक्रम घेतलाय हाती'

मराठा आरक्षण: ‘भाजपा नेत्यांनी आग लावण्याचा कार्यक्रम घेतलाय हाती’

Subscribe

मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी विपर्यास करून आग लावण्याचा कार्यक्रम भाजपा नेत्यांनी हाती घेतला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांच्यावर केली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टात एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु असून १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा राज्यात राजकीय वादविवाद सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुनावणीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असून त्या पत्रावरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.

फडणवीस यांच्या पत्रात काय आहे?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात ते म्हणाले आहे की, ‘मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात सहाय्य करण्यात राज्य सरकारचे अधिकारी कमी पडत असून, या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे,’ अशी मागणी केली आहे. फडणवीसांच्या या मागणीवरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे’.

- Advertisement -

काँग्रेसने केले टीकास्त्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करत त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले आहे की, ‘मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी विपर्यास करून आग लावण्याचा कार्यक्रम भाजपा नेत्यांनी हाती घेतला आहे. संघाशी संबंधित जे विधिज्ञ दिल्लीत पूर्वी राज्य सरकारचे काम पाहत होते आणि आता दूर करण्यात आले आहेत ते पत्रकारांना फोन करुन चुकीची माहिती देत आहेत याची दखल सरकारने घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मुकुल रोहतगी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर व्हर्च्युअल सुनावणीतील अडचणी सांगून प्रत्यक्ष सुनावणीचा आग्रह धरत आहेत. याची जाणीव त्यांना आहे. न्यायालयाने पुढे इतर वकिलांनी देखील प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती केली. ‘ALSO म्हणजे देखील’ चा अर्थ वकिलीचे शिक्षण घेतलेल्या फडणवीस यांना माहित नाही, असे नाही. एके ठिकाणी प्रत्यक्ष सुनावणी झाली पाहिजे, असे म्हणायचे आणि स्वतःच नियुक्त केलेल्या वकिलांच्या वक्तव्यावर आक्षेप घ्यायचा हा दुटप्पीपणा आहे. यांना आरक्षणाशी घेणं देणं नाही. तर केवळ राजकारण करायचे आहे’, अशी टीका सावंत यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rafale Fighter Jet : ‘राफेलमुळे हवाई दलाची ताकद वाढेल पण ती गेमचेंजर ठरणार नाही’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -