घरदेश-विदेशRafale Fighter Jet : 'राफेलमुळे हवाई दलाची ताकद वाढेल पण ती गेमचेंजर...

Rafale Fighter Jet : ‘राफेलमुळे हवाई दलाची ताकद वाढेल पण ती गेमचेंजर ठरणार नाही’

Subscribe

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमान सामील होणार आहे. फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज दुपारी एक ते तीन दरम्यान कोणत्याही वेळी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, भारताने हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्याने नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले.

भारताने ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमाने भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्याने चीनची चिंता वाढेल, असे वाटत नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार

आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही. जर भारतानं सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्याने चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही. भारताने राफेल हवाई दलात सामावून घेतले आहे हे चांगले आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल, असे वाटत नाही.

हेही वाचा –

जम्मू काश्मीर : राजौरीच्या घुसखोरीत २ दहशतवाद्यांचा खात्मा; १ जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -