घरमहाराष्ट्रSCC Result : दहावीच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्क्यांनी वाढ

SCC Result : दहावीच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्क्यांनी वाढ

Subscribe

राज्यातील नऊ विभागीय मंडळातंर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. दरवर्षी यंदाही दहावीच्या परीक्षेत कोकणाचा व मुलींचा वरचष्मा राहिला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला तर मुलींचा निकाल ९६.११ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात तब्बल १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी निकालात घट झाल्याने विद्यार्थ्यांना नामाकिंत कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी धडपड करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र मुलांचा मार्ग सुकर झाला असला तरी त्यांना सीबीएससी व आयसीएससीच्या विद्यार्थ्यांचे कडवे आव्हान असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या निकाला विलंब झाल्याने सर्वांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांचा निकाल जाहीर केला. यामध्ये कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.३० टक्के लागला तर औरंगाबाद विभागाच्या निकालात प्रचंड घसरण झाली आहे. गतवर्षी सहाव्या क्रमांकावर असलेले औरंगाबाद विभागाचा यंदा सर्वाधिक कमी ९२ टक्के निकाल लागला आहे. तर कोल्हापूर (९७.६४ टक्के), पुणे (९७.३४ टक्के) विभागाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई विभागाने ९६.६७ टक्के निकालासह पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर नाशिक विभागाचा क्रमांक चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. नाशिकचा निकाल यंदा ९३.७३ टक्के लागला आहे. गतवर्षी राज्याच्या निकालामध्ये प्रचंड घट झाली होती. त्यातुलनेत यंदा निकाला चांगला लागला आहे. गतवर्षी राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला असून, यंदा त्यात १८.२० टक्क्यांनी वाढ होऊन तब्बल ९५.३० टक्के इतका निकाल लागला आहे.

- Advertisement -

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागातून जाहीर करण्यात आलेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९६.९१ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांपेक्षा मुलींची टक्केवारी ३.०१ टक्क्यांने अधिक आहे. राज्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ८ लाख ४० हजार ६१२ तर मुलींची संख्या ७ लाख ३४ हजार ४९१ इतकी होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ७ लाख ८९ हजार ३०९ तर विद्यार्थीनींची संख्या ७ लाख ११ हजार ७९६ इतकी आहे.

विभागानुसार निकालाची  टक्केवारी –

मंडळ                       टक्केवारी
पुणे                          ९७.३४
नागपूर                      ९३.८४
औरंगाबाद                  ९२.००
मुंबई                        ९६.७२
कोल्हापूर                  ९७.६४
अमरावती                  ९५.१४
नाशिक                    ९३.७३
लातूर                      ९३.०९
कोकण                    ९८.७७

- Advertisement -

एकूण                      ९५.३०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -