घरताज्या घडामोडीCongress : भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीत कॉंग्रेसचा समावेश ? शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका

Congress : भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीत कॉंग्रेसचा समावेश ? शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यात देशात तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने बैठक झाली. देशपातळीवर भाजपविरोधात मजबूत आघाडी निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून केसीआर मुंबई दौऱ्यावर रविवारी होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधात सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या गोष्टीकडे पाहिले जात आहे. पण कॉंग्रेसला सोबत घेणार का ? या मुद्द्यावर शिवसेनेकडून महत्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की कॉंग्रेसशिवाय कोणताही फ्रंट निर्माण होणार नाही. ममता बॅनर्जी जेव्हा मुंबईत आल्या होत्या तेव्हाही आम्ही कॉंग्रेसला सोबत घेऊनच जायला हवे, हाच मुद्दा कायम ठेवला होता. त्यानंतरच केसीआर हे मुंबई दौऱ्यात आले होते. त्यामध्येही आम्ही हीच गोष्ट स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

तिसऱ्या आघाडीचे बैठक कुठे ?

केसीआर यांनाही कॉंग्रेसबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनीही देशपातळीवर तसेच प्रादेशिक पातळीवर नेत्यांसोबत बैठका घेऊन पुढची रणनिती ठरवणार असल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीबाबतची समविचारी पक्षांची बैठक ही देशात हैद्राबाद येथेही लवकर होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर बारामती येथे बैठकीचाही प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देशात अतिशय गढूळ वातावरण असल्याचे म्हटले. देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे हिंदुत्व कधीच सुडाच्या भावनेतून नव्हते असेही ते म्हणाले. देशाच्या चांगल्या भविष्यासाठी एक सुरूवात करण्याची गरज आहे, आजची बैठक याच गोष्टीची सुरूवात असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये जो माहोल आहे, तो सध्या दिसत नाही. देशात अतिशय खालच्या पातळीचे राजकारण होत आहे. ही परिस्थिती बदलायला हवी असेही ते म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांवरील शिवराळ भाषेवर संजय राऊतांचा यू-टर्न, म्हणाले ‘अत्यंत सौम्य… ‘

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -