घरताज्या घडामोडीIndia corona update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट! २४ तासांत १६,०५१ नव्या रुग्णांची...

India corona update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट! २४ तासांत १६,०५१ नव्या रुग्णांची नोंद, तर २०६ जणांचा मृत्यू

Subscribe

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवस देशात २४ तासांत २० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दैनंदिन मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. काल, रविवारी देशात १९ हजार ९६८ नव्या रुग्णांची नोंद आणि ६७३ जणांचा मृत्यू झाला होता. आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ३ हजार ९१७ने घट झाली आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत ४६७ने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १६ हजार ५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २०६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १.९३ टक्के झाला आहे. सध्या देशात २ लाख २ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २८ लाख ३८ हजार ५२४
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख १२ हजार १०९
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी २१ लाख २४ हजार २८४
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २ लाख २ हजार १३१
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७६ कोटी ४१ हजार ६७७
देशातील एकूण लसीकरण – १ अब्ज ७५ कोटी ४६ लाख २५ हजार ७१०

इतर देशातील कोरोनाची परिस्थिती

अमेरिका :- एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ७ कोटी ८४ लाख ७६ हजार ८६९, एकूण मृत्यू – ९ लाख ३५ हजार ३३१
भारत :- एकूण कोरोनाबाधितांची संख्या -४ कोटी २८ लाख ३८ हजार ५२४, एकूण मृत्यू – ५ लाख १२ हजार १०९
ब्राझील – एकूण कोरोनाबाधितांची संख्या – २ कोटी ८२ लाख १८ हजार १८०, एकूण मृत्यू – ६ लाख ४४ हजार ५९२
फ्रान्स :- एकूण कोरोनाबाधितांची संख्या – २ कोटी २४ लाख ४५ हजार ५८०, एकूण मृत्यू – १ लाख ३७ हजार ५९६
यूके :- एकूण कोरोनाबाधितांची संख्या – १ कोटी ८७ लाख ३५ हजार ९११, एकूण मृत्यू – १ लाख ६१ हजार १४८

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update : 0,0,0,0 एकाच आठवड्यात मुंबईत चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -