घरमहाराष्ट्रकाँग्रेस नेत्यांनाही सलमानसोबत फोटो घेण्याचा मोह आवरेना

काँग्रेस नेत्यांनाही सलमानसोबत फोटो घेण्याचा मोह आवरेना

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज धुळे अणि मुंबई येथे जाहीर सभा आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी मुंबई विमानतळावर आले होते. यावेळी सलमान खान तिथे आला, तेव्हा सलमान खानसोबत फोटो काढण्याचा मोह या नेतेमंडळींनाही आवरता आला नाही.

सलमान खान… लाखो तरुणांचा चाहता असलेल्या सलमान सोबत एक तो फोटो बनती है ना बॉस! अशीच काहीशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांची असते. सल्लू भाईच्या वाढदिवसाला तर रात्रभर त्याच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची त्याला पाहण्याची, त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याची इच्छा असते. आता या सल्लू भाईचे चाहते राजकारणी देखील आहेत. सलमानचे जेवढे मित्र त्याच्या बॉलिवूडमध्ये नसतील त्याहून जास्त मैत्री त्याची राजकारण्याशी आहे. आतापर्यंत मोदींसोबत पतंग उडवणारा सलमान, नेत्यांच्या मूलांच्या लग्नात आवर्जून हजेरी लावणार सलमान सगळ्यांनी पाहिला आहे. राजकारण्याशी जवळीक असलेल्या याच सलमान सोबत आज काँग्रेसच्या नेत्यांनी चक्क फोटो काढला, तोही विमानतळावर! आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे आणि मुंबई येथे जाहीर सभा आहे. यामुळे काँग्रेसचे सर्व नेते राहुल गांधी यांची मुंबई विमानतळावर वाट पाहत बसले होते. त्याच दरम्यान सलमान देखील तिकडे होता. मग काय या सलमान सोबत काँग्रेसच्या नेत्यांनी देखील फोटो घेतला की राव!

संध्याकाळी राहुल गांधीची मुंबईत सभा

दरम्यान थोड्याच वेळात राहुल गांधी यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा सुरू होणार असून, त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईत बिकेसीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. सध्या भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या वातावरणावर राहुल गांधी काय बोलणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -