घरमहाराष्ट्रतकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारचा जनतेच्या जीवाशी खेळ - सचिन सावंत

तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारचा जनतेच्या जीवाशी खेळ – सचिन सावंत

Subscribe

औरंगाबाद मेडिकल कॉलेजने दिलेल्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं.

केंद्र सरकारने ‘पीएम केअर फंडा’तून महाराष्ट्राला दिलेल्या व्हेंटिलेटरवरुन वाद सुरु आहेत. केंद्राने दिलेल्या व्हेंटिलेटर्स सदोष असल्याचं महाविकास आघाडी सरकारने म्हटलं आहे. यावरुन ‘पीएम केअर फंडा’तील व्हेंटिलेटरवरुन राजकारण करू नये, अशी टीका भाजप नेत्यांनी केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते सचिन सावंत यांनी एक अहवाल शेअर करत केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने व्हेंटिलेटरबाबत तयार केलेला आहवाल सादर केला आहे. यामध्ये केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर हे सदोष असल्याचं म्हटलं आहे. यावरुन सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. “भाजप नेत्यांचे तोंड फोडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या १७ मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकारचा गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. कंपनीचे ५८ व्हेंटिलेटर तकलादू निघाल्याने इतर ३७ व्हेंटिलेटर खोलण्याचे या कंपनीचे धैर्यच झाले नाही. १४ मेला केंद्र सरकारने केलेली सारवासारव खोटी होती. ज्योती सीएनसी चे व्हेंटिलेटर १२ एप्रिलला आले. केंद्र सरकारने १९ एप्रिल सांगितले हे खोटं आहे. १२ एप्रिललाच जिल्हाधिकाऱ्यांना हे वापरण्यासारखे नाही असा अहवाल दिला आहे.”

- Advertisement -

“१८ एप्रिलला ज्योती कंपनीच्या सहदेव मुचकुंद व कल्पेश या तंत्रज्ञांनी २५ धामण-३ हे व्हेंटिलेटर इन्सटॉल केले जे २० तारखेपर्यंत गंभीर त्रुटींमुळे परत आले. २३ ला पुन्हा तंत्रज्ञांना बोलवले पण त्यांनी दुरुस्त केलेले २ व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. त्यानंतर या तंत्रज्ञांनी तोंड दाखवलं नाही. ६ मेला व १० मेला या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीने तसा अहवाल दिला आहे. यानंतर काँग्रेसने आवाज उठवल्यावर १३ व १४ मेला राजेश रॉय व आशुतोष गाडगीळ हे तंत्रज्ञ आले. त्यांनी दुरुस्त केलेले २ व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. नंतर त्यांनी पळ काढला आहे.”

- Advertisement -

“खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालयेही ती वापरत नाहीत. भाजपाकडून नाहक बदनामी केली जात आहे. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे,” अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विट करत केली आहे.

“म्हणून या केंद्र सरकारच्या १४ मेला केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने केंद्राचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झाले. तसेच आमची केंद्र व राज्य सरकारने एकत्रित लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची मागणी पूर्णपणे योग्य आहे हे सिद्ध झालं,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -