घरदेश-विदेशCyclone Tauktae: गुजरातमध्ये तौक्तेचा लँडफॉल; कुठे पाऊस, किती बळी?

Cyclone Tauktae: गुजरातमध्ये तौक्तेचा लँडफॉल; कुठे पाऊस, किती बळी?

Subscribe

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गेल्या २४ तासात मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने होत असला तरी आजही मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काल दिवसभर तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईसह गुजरातमध्ये तडाखा बसल्यानंतर मध्यरात्री लँडफॉल झाला. सध्या गुजरातमधील अमरेली येथे चक्रीवादळाचा वेग १० किमी आहे तर उत्तरेसह ईशान्यकडील भागात या वादाळाचा वेग ९५ किमी असा आहे. यासह १३५ किलोमीटर प्रतितास वेगाने या वाऱ्याचा वेग असणार आहे.

- Advertisement -

 

तौक्ते चक्रीवादळाचा लँडफॉल सुरु झाला असून, पुढील १२ तासांमध्ये टप्प्याटप्प्याने या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. पण, याचे परिणाम मात्र प्रभावित क्षेत्रांमध्ये काही तासांपर्यंत दिसणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  तौक्ते चक्रीवादळ जरी गुजरात दिशेने सरकले असले तरी मुंबईत आजही अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. आज मुंबईत वाऱ्याचा वेग ८० ते ९० किमी प्रतितास असण्याचा अंदाजही वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई शहर व उपनगरामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तर मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. आज समुद्राला दुपारी साडेचार वाजेदरम्यान भरती राहणार असून ३.७९ मीटर उंचीच्या लाटा असतील तर १० वाजून ५० मिनिटांनी समुद्रात ओहोटी असून लाटांची उंची देखील २.२५ मीटर अशी असणार आहे.

- Advertisement -

राज्यात एकूण ६ मृत्यू ९ जण जखमी

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. तौक्ते चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत . मिळालेल्या माहितीनुसार या वादळामुळे राज्यात एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झालेत.

काल दिवसभरात कुठे किती पावसाची झाली नोंद :

  • पणजी ८ मिमी
  • कोल्हापूर ०.४ मिमी
  • पुणे ३.२ मिमी
  • रत्नागिरी ६३.३ मिमी
  • सातारा ६.६ मिमी
  • ठाणे-बेलापूर ८९.८ मिमी
  • नाशिक १३.५ मिमी
  • माथेरान ४६.४ मिमी
  • पालघर २९.८ मिमी
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -