घरमहाराष्ट्रमहाराजांच्या दैवतीकरणाच्या फोटोवरून वाद

महाराजांच्या दैवतीकरणाच्या फोटोवरून वाद

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाच्या फोटोवरून आता वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियवर याबद्दल संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाच्या फोटोवरून आता वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियवर याबद्दल संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत. चित्रकार सचिन जुवाटकर शिवाजी महाराजांचं हे चित्र साकारलं आहे. जहांगीर आर्ट गॅलरीतील सचिन जुवाटकर यांच्या या चित्रामुळे वाद निर्माण होताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवी अवतारातले हे चित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे महाराजांचेसुद्धा दैवीकरण होत असल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत आणि इतर बऱ्याच जणांनी या फोटोचे कौतुक करून फोटोसेशन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा टिकेची झोड उठताना दिसत आहे. दरम्यान, टीका होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे फोटो फेसबुकवरून काढून टाकत स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

छत्रपती शिवरायांच्या दैवतीकरणाला मी अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवरायांचे कर्तृत्व, प्रत्येक विचार जनतेमध्ये रुजले पाहिजेत असाच माझा प्रयत्न राहिला आहे. काल मी एका चित्रप्रदर्शनाला केवळ काही कलाकृती पाहण्यासाठी भेट दिली होती, त्यापेक्षा अधिक काहीही नाही. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. शिवाय त्यांनी फोटो देखील फेसबुकवरून हटवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -