घरमुंबईकल्याणमध्ये मोदींच्या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ

कल्याणमध्ये मोदींच्या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ

Subscribe

कल्याण - मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.

कल्याण – मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे. मोदींचा ताफा ज्या रस्त्याने येणार आहे, तसेच मोदींचा हा कार्यक्रम ज्या फडके मैदानात होणार आहे, तेथील रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. एरव्ही कल्याण येथील रस्त्यावरील खड्ड्याची दखल न घेणारे पालिका प्रशासनाचे अधिकारी आता चक्क स्वतः लक्ष देत खड्डे डांबरीकरण करून ते बुजवून घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेने गांधारी ते लालचौकीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची डागडुजी केली असून याची पाहणी स्वतः आयुक्त गोविंद बोडके करत आहेत.

हेलिपॅडची जागा शोधण्यासाठी दमछाक

विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर कुठे उतरवायचे इथपासून सुरु झालेली दमछाक आता भिवंडीतील जागा निश्चित झाल्याने कमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकच्या मोकळ्या जागेत मोदींचे हेलिकॉप्टर लँड होणार यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या लँडिंग आणि टेकऑफमध्ये अडथळा होऊ नये म्हणून यासाठी तिथे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारादेखील हटविण्याचे काम करण्यात आले आहे.

- Advertisement -

हा मोदींसाठी दिखाऊपणा

दरम्यान, मोदी येणार म्हणून हा सर्व दिखाऊ पणा सुरु असून पुन्हा खड्ड्यांची अवस्था जैसे थे, होणार अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली. ज्या फडके मैदानात मोदींची सभा आहे त्या मैदानासमोरचा भला मोठा खड्डा इतकी वर्षे बुजवला नाही. पण आता बुजवला, त्यामुळे यांना सर्वसामन्यांशी काही देणंघेणं नसून हा दिखाऊपणा असल्याचे या रहिवाशांनी सांगितले.

- Advertisement -

मैदानाची क्षमता

फडके मैदानाची क्षमता २५ हजार नागरिकांची असून येथे दहा हजार खुर्च्या लावण्यात येत 8 एलईडी आणि दुसऱ्या बाजूला काही खुर्च्या लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -