घरमहाराष्ट्रपुसद दंगलीप्रकरणी १३ वर्षांनी दोषींना सुनावली शिक्षा, पाच वर्षांचा कारावास

पुसद दंगलीप्रकरणी १३ वर्षांनी दोषींना सुनावली शिक्षा, पाच वर्षांचा कारावास

Subscribe

यवतमाळ – २००९ साली यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी तीन दोषींना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तब्बल १३ वर्षांनी याप्रकरणी पुसद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. इम्रान खान अस्लम खान, आरिफ खान निसार खान, शेख निसार शेख नजुल्ला अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र, या घटनेतील सात आरोपी अद्यापही फरार आहेत.

३ एप्रिल २००९ मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान पुसद शहरात मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले होते. यावेळी जगदीश जाधव या इसमावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे या परिसरात तब्बल दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी जगदीश जाधव यांचे भाऊ अॅड. भरत जाधव यांच्या तक्रारीनंतर दंगल भडकवणाऱ्यांविरोधात आर्म्स अॅक्टसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी तीन दोषींना २५ हजारांचा दंडासहित पाच वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -