घरमहाराष्ट्रराज्यात ३ हजार १५ नवे कोरोनाबाधित, ५९ जणांचा मृत्यू

राज्यात ३ हजार १५ नवे कोरोनाबाधित, ५९ जणांचा मृत्यू

Subscribe

मृतांची संख्या पोहोचली ५० हजार ५८२ वर

राज्यात बुधवारी ३,०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,९७,९९२ झाली आहे. राज्यात ४६,७६९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,५८२ वर पोहोचली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. यामध्ये मुंबई ९, कल्याण डोंबिवली मनपा २६, पुणे ५, भंडारा २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५९ मृत्यूंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू ठाणे २४, पुणे २, नागपूर १, रायगड १, रत्नागिरी १, पालघर १ आणि यवतमाळ १ असे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -