घरदेश-विदेशअमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले जो बायडन, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यपदी

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले जो बायडन, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यपदी

Subscribe

एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही - जो बायडेन

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्याक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे ते ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या लोकशाहीसाठी आज मोठा दिवस असल्याचे जो बायडेन यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर कॅपिटल येथे आयोजित शपथविधीच्या कार्यक्रमात त्यांनी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. भारतीय वंशाच्या आणि अमेरिकेच्या रहिवासी कमला हॅरिस यांनी देखील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. अमेरिकेतील वेस्ट फ्रंट कॅपिटल येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये ३५ हजार राष्ट्रीय गार्ड तैनात केले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिले भाषण दिले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या लोकशाहीसाठी हा मोठा आणि महत्त्वाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. आजचा दिवस हा इतिहास आणि आशेचा दिवस आहे. शपथविधी घेत असलेल्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठी हिंसा झाली होती. परंतु आता देशासाठी खुप काही करण्याची गरज आहे. असे जो बायडेन यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

बायडेन पुढे म्हणाले की, आपण सगळे एकजूट होऊन अमेरिकेच्या विकासासाठी काम करु. देशातील दहशतवादाला हरवण्याचे आवाहन बायडेन यांनी देशवासीयांना केले आहे. अमेरिकेतील जनतेले एकत्र आणणे हेच माझे पहिले लक्ष असणार आहे. एकत्र येऊन अमेरिकेचा विकास करु, असे आवाहन बायडेन यांनी आपल्या भाषणाच्या निमित्ताने केले. एकजूटीनेच देशाचा विकास घडवण्यासाठी मेहनतीने काम करु, अमेरिकेतील वर्णभेद संपवण्यासाठी आपल्याला लढाई लढायची आहे. आणि ही लढाई एकजुटीशिवाय जिंकणे शक्य नाही. कॅपिटल हिलमध्ये झालेली हिंसा पून्हा कधीच घडणार नाही असाही आशावाद त्यांनी बोलून दाखवला. आपल्या देशाला पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष मिळाल्या असल्याचे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांनी मला समर्थन दिले नाही त्यांच्यासोबतही मी उभा असल्याचे जो बायडेन यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -