घरमहाराष्ट्रचारचाकी गाडीत आढळला 'त्या' दोघांचा मृतदेह

चारचाकी गाडीत आढळला ‘त्या’ दोघांचा मृतदेह

Subscribe

पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेत पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी गाडीत महिला आणि पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. मात्र त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेत पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी गाडीत महिला आणि पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. त्यांनी चारचाकी गाडीत विष प्राशन केल्याचं देहूरोड पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत. अमोल रविंद्र शितोळे (रा. कासारसाई वय-३०) आणि अनुपमा नवनाथ कारंडे (रा. वाकड वय-४१), अशी आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

दोघांनी विष प्राशन केल्याचे समजते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ नोव्हेंबरच्या रात्री पावणे आठच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ एका मोटारीत एक महिला आणि एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. या दोघांनी विष घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. मृत अमोल हे शेती व्यवसाय करत असल्याचं सांगण्यात येत असून मृत महिला ही गृहिणी असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्याचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -