घरमहाराष्ट्रपुणेबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर, पण जेलमध्ये राहावे लागणार

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर, पण जेलमध्ये राहावे लागणार

Subscribe

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, ते जेलमधून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याच्याविरोधात चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांखाली त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना कोठडीत रहावे लागणार आहे.

मंगळवारी सुप्रीम कोर्टात डीएसकेंच्या (दीपक सखाराम कुलकर्णी) जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय देत अखेर डीएसकेंना जामीन मंजूर केला. दरम्यान, गेल्या चार पेक्षा जास्त वर्ष झाले दीपक सखाराम कुलकर्णी हे कोठडीच आहेत. ठेवीदारांनी केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंचर चार वर्षांनी डीएसके यांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टात काय झाला युक्तीवाद –

डीएसके यांनी एडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव आणि रितेश येवलेकर यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली. राज्य सरकारला या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. राज्य सरकारने डीएसकेंच्या जामीनाला विरोध केला. दरम्यान, अद्याप डीएसकेंवरील दोषारोप निश्चित झालेले नाही. तसेच त्यांची बँक खाती, संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. आणि अद्याप खटल्यालाही सुरुवात झालेली नसल्याने त्यांच्या जामीन अर्जावर योग्य तो विचार करावा, असा युक्तिवाद डीएसकेंच्या वकिलांमार्फत करण्यात आला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -