घरक्राइमलाचखोर अभियंता बागूलच्या घरात कोट्यवधींचे घबाड !

लाचखोर अभियंता बागूलच्या घरात कोट्यवधींचे घबाड !

Subscribe

नाशिक : आदिवासी विभागाचा बांधकाम अभियंता दिनेशकुमार बागूल याच्या पुणे येथील निवासस्थानी 45 लाख 40 हजारांची, तर नाशिक येथील फ्लॅटमधून तब्बल 98 लाख 63 हजारांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. बागूलच्या या दोन्ही घरांमधूून महत्वाचे दस्तावेजही ताब्यात घेण्यात आले असून बागूलने कोट्यवधींची राशी जमा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्यापही या सर्व मालमत्तेचा तपास सुरू असून, नोटा मोजण्यासाठी यंत्र आणि बँक अधिकार्‍यांची मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात येते.

लाचखोर बागूलला शुक्रवारी (दि. 26) न्यायालयात हजर केले असता रविवारी (दि. 28)पर्यंत म्हणजेच तीन दिवस त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनच्या टेंडरचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी ठेकेदाराकडून 12 टक्के दराने 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याा रंगेहात जाळ्यात अडकवले आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, आदिवासी विभागाच्या हरसूल अदिवासी आश्रमशाळेसाठी आर. के. इन्फ्रा कॉन्स्ट्रो प्रा. लि. कंपनीने सेंट्रल किचनचे 2 कोटी 40 लाखांचे ऑनलाईन टेंडर भरले होते. ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला हे टेंडर मिळाले होते. मंजूर टेंडरचे कार्यारंभ आदेश काढण्यासाठी अभियंता बागूलने टेंडरच्या किंमतीचे 12 टक्क्यांप्रमाणे 28 लाख 80 हजार रुपये लाचस्वरूपात मागितले होते.

ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या १५ दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पथकाने सलग १५ दिवस सापळा रचून बागूलला राहत्या घरी लाचेची रक्कम स्विकारताना अटक केली. निरीक्षक अनिल बागूल, किरण अहिरराव, अजय गरुड, नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -