घरक्राइमबिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; 'हे' आहे तज्ञांच मत

बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; ‘हे’ आहे तज्ञांच मत

Subscribe

नाशिक : मोचा चक्रीवादळानंतर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टीतील बाष्पाचे रूपांतर साधारणतः शनिवारी (दि.१०) पर्यंत बिपरजॉय चक्रीवादळात होईल. मात्र, या चक्रीवादळाचा कुठलाही धोका महाराष्ट्राला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. तसेच, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी माय महानगरशी बोलताना केले.

मान्सूनवर अशा चक्रीवादळांचा काहीही परिणाम होत नाही. उलट मान्सून संपला किंवा सुरू होण्यापूर्वी वातावरणातील अस्थिरतेमुळे अशी चक्रीवादळे निर्माण होत असतात. थोडक्यात वादळे ही एकंदर मान्सूनच्या रचनेचाच भाग असतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. सध्या बिपरजॉय चक्रीवादळाचा झोत हा गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस ९३० किमी आणि मुंबईच्या नैऋत्येस १ हजार ६० किमी अंतरावर म्हणजे मुंबई ते पुणे अंतराच्या सुमारे पाच पट अंतरापेक्षा जास्त दूर आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे ताशी १० किमी वेगाने फिरते. त्याच वेगाने हवेतील बाष्प पुढे सरकत फिरते आहे. यामुळे हे चक्रीवादळाचे बाष्प आपली दिशा बदलून महाराष्ट्राला कधीच धडकणार नाही. ते साधारणतः पुढील आठवड्यात हवेत विरले नाही तर पश्चिमेकडे सरकत गुजरात व पाकिस्तानच्या दिशेने आगेकूच करत लँडफॉल करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

’बिपरजॉय’नंतर ’तेज’चा धोका

’बिपरजॉय’ हे चक्रीवादळानंतर तेज नावाचे चक्रीवादळ येणार आहे. तेज हे नाव भारताने दिले आहे. तेज चक्रीवादळानंतर अनुक्रमे हमून, मिधिली, मिचौंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ती, महिना, सेयर, दितवाह अशी पुढील ११ चक्रीवादळांची नावे असतील. विशेष म्हणजे ही सर्व चक्रीवादळांची नावे साधारणतः जून २०२६ पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील अशी माहितीदेखील हवामान तज्ज्ञ प्रा. जोहरे यांनी दिली.

चक्रीवादळाला असे पडले ’बिपरजॉय’ नाव

’बिपरजॉय’ हे चक्रीवादळाच्या दुसर्‍या यादीतील पहिले नाव असून, बांगलादेशाने चक्रीवादळाला हे नाव दिले आहे. ’बिपरजॉय’ या शब्दाचा अर्थ आपत्ती किंवा इंग्रजीत डिझास्टर असा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -