घरमहाराष्ट्रनांदेड शासकीय रुग्णालयात 'मृत्यू तांडव' सुरूच, 'या' धक्कादायक कारणामुळे झाला चिमुकलीचा मृत्यू

नांदेड शासकीय रुग्णालयात ‘मृत्यू तांडव’ सुरूच, ‘या’ धक्कादायक कारणामुळे झाला चिमुकलीचा मृत्यू

Subscribe

गेल्या काही तासांत नांदेडच्या शासकीय रुग्णालयात चिमुकल्यांच्या मृत्यूने पुन्हा खळबळ उडाली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये तीन चिमुकल्यांनी जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेड : जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी (ता. 02 ऑक्टोबर) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. परंतु, या रुग्णालयात सुरू असलेला रुग्णांच्या मृत्यूचा तांडव अद्यापही थांबलेला नाही. किमान एक तरी रुग्ण मरण पावल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय सेवेवर प्रश्न उपस्ठित करण्यात येत आहेत. तर रुग्णालयात निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. (‘Death frenzy’ continues in Nanded Government)

हेही वाचा – निष्पक्ष चौकशी करण्याची हिंमत शासनाने दाखवावी, सुप्रिया सुळे यांचे थेट आव्हान

- Advertisement -

गेल्या काही तासांत या रुग्णालयातील चिमुकल्यांच्या मृत्यूने पुन्हा खळबळ उडाली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये तीन चिमुकल्यांनी जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे. यांतील एका साडेचार महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप चिमुकलीच्या पालकांकडून करण्यात आला आहे. मीडियाला माहिती दिली म्हणून तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले होते, असा गंभीर आरोप मुलीची आई अनुसया काळे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका साडेचार महिन्यांच्या चिमुकलीला उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. परंतु या मुलीच्या पालकांनी मीडियाला रुग्णालयात सुरू असलेल्या गलथान कारभाराची माहिती दिल्याने रुग्णालयाकडून या बाळावर सुरू असलेले उपचार थांबविण्यात आले. असा गंभीर आरोप मृत पावलेल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीची आई असलेल्या अनुसया काळे यांनी केला आहे.

- Advertisement -

परंतु, बाळाच्या हृदयाला जन्मत:च छिद्र होते. असे रुग्ण जगण्याची शक्यताच कमी असते. तरीही अॅडमिट करून घेतले. बाळाच्या घरच्यांकडून चुकीचे आरोप करण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पण या रुग्णालयात होणारे मृत्यू नेमके कोणत्या कारणामुळे होत आहेत, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या 24 तासांमध्ये तीन नवजांत बालकांव्यतिरिक्त एक लहान बाळ आणि 10 प्रौढांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -