घरमहाराष्ट्रकाँग्रेस गटनेत्याचा निकाल दिल्ली दरबारी

काँग्रेस गटनेत्याचा निकाल दिल्ली दरबारी

Subscribe

केंद्रीय नेत्यांच्या देखरेखीनंतर होणार निर्णय

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांची त्यांच्या त्यांच्या विधीमंडळ गटनेते निवडीसाठी घाई सुरु असतानाच काँग्रेसला अद्याप गटनेता निवडीला मुहूर्त मिळालेला नाही. भाजपसह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेत्यांची नावे जाहीर केली असली तरी अद्याप काँग्रेसने विधीमंडळ गटनेता निवड केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचविल्या आहे.

गुरुवारी टिळक भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या गटनेता ठरण्याची शक्यता होती. मात्र तो मुहूर्त टळल्याने आता सर्वांचे लक्ष दिल्लीकडे लागून राहिले आहे. गुरुवारची बैठक ही फक्त आमदारांची बैठक होती. लवकरच केंद्रीय नेत्यांचे एक पथकांच्या देखरेखीखाली ही निवड केली जाणार असल्याच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांनी गटनेता निवडीसाठी सर्वत्र धावपळ सुरु केली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने गुरुवारी एकनाथ शिंदे यांची निवड केली. तर राष्ट्रवादीतर्फे अजित पवार यांची निवड झाली असली तरी अद्याप काँग्रेसकडून यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या हालचाली अद्याप दिसून आलेल्या नाही. गुरुवारी मुंबईतील टिळक भवनात आयोजित केलेल्या आमदारांच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या बैठकीत ही कोणताही निर्णय न झाल्याने सर्व आमदारांच्या नजरा गटनेत्यांच्या निवडीकडे लागून राहिले आहे.

गुरुवारी दादर येथील टिळक भवनात झालेल्या बैठकीत राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सर्व जण मिळून जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल नवनिर्वाचीत आमदारांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे व आ. बाळासाहेब थोरात यांनी नवनिर्वाचीत आमदारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -