घरमहाराष्ट्रमहामेट्रोचा गणेश विसर्जनापर्यंत रस्त्यावर ब्रॅकॅटिंग न करण्याचा निर्णय

महामेट्रोचा गणेश विसर्जनापर्यंत रस्त्यावर ब्रॅकॅटिंग न करण्याचा निर्णय

Subscribe

पुणे येथील बातम्या वाचा थोडक्यात.. एका क्लिकमध्ये वाचा अनेक बातम्या

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मेट्रोच्या कामामुळे गणेश मंडळांना मंडप उभारण्यास येणार्‍या समस्यांचा विचार करून महामेट्रोने गणेश विसर्जनापर्यंत रस्त्यावर नव्याने कोणतेही ब्रॅकॅटिंग न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘रिच-२’ चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली. गणेशोत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रातुन गणेशभक्त गणपती पाहण्यासाठी शहरात येतात. त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाच्या वर्षी शहरात महामट्रोकडून कर्वे रॊड, पौड रोड, आयडीयल कॉलनी याठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी ब्रॅकॅटिंग करून मेट्रो मार्गाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.याच रस्त्यांवर गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळाचे मंडप टाकण्यात येतात.

मेट्रोचे ब्रॅकॅटिंग आणि मंडप एकाचवेळी रस्त्यांवर टाकण्यात आल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे काही गणेश मंडळांनी महामेट्रोची भेट घेऊन ब्रॅकॅटिंग कमी जागेत करण्याची मागणी केली. मात्र ते शक्य नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. परंतु गणेश विसर्जनापर्यंत नव्याने महामेट्रोकडून ब्रॅकॅटिंग करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यावरील गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी कमी जागेत मंडप टाकावेत अन्यथा मुख्यरस्ता सोडून अन्य ठिकाणी मंडप उभारणे शक्य असल्यास तो उभारावा असे आवाहन देखील महामेट्रोकडून गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

कोंढव्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन परदेशी मुलींची सुटका

पुणे । कोंढव्यातील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन परदेशी मुलींची सुटका केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कोंढव्यातील शालिमार हिल्स सोसायटीमध्ये करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील शालिमार हिल्स सोसायटीमध्ये परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे हवालदार तोगे यांना मिळाली होती. तोगे यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना कळवल्यानंतर कुंभार यांनी सहकार्‍यांसोबत जाऊन याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या फ्लॅटमध्ये आढळून आलेल्या दोन मुलींकडे चौकशी केली असता पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी सादर मुलींची सुटका करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

तांत्रिक कामासाठी 30 ऑगस्टपर्यंत ब्लॉक

railway track crack on mumbai-pune railway lineपुणे | पुणे-दौंड रेल्वमार्गावरील देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी येत्या 30 ऑगस्टपर्यंत ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या ब्लॉक’मुळे पुणे-बारामती-पुणे पॅसेंजर 30 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. तसेच पुणे-दौंड मार्गाद्वारे येणार्‍या काही रेल्वेंच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
अमरावती-पुणे एक्सप्रेस (11046) ही गाडी मंगळवारी (दि.28) दौंड स्टेशनवर 50 मिनिटे, तर रविवारी (दि.26) 1 तास 50 मिनिटांचा थांबा घेणार आहे. हैद्राबाद-पुणे एक्सप्रेस (17014) दौंड स्टेशनवर दीड तासांचा थांबा घेणार आहे. जबलपूर-पुणे विशेष गाडी (01656) सोमवारी (दि.27) दौंड स्टेशनवर 50 मिनिटांचा थांबा घेणार आहे. पुणे-हैद्राबाद एक्सप्रेस (17013) सोमवारी (दि.27) आणि शनिवारी (दि.25) आपल्या निर्धारित वेळेच्या एक तास उशिराने तर बुधवारी (दि.29) निर्धारित वेळेच्या 45 मिनिटे उशिराने सुटणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने कळविली आहे.


कुख्यात दरोडेखोर पुणे ग्रामीण पोलिसाच्या तावडीत

पुणे । कुख्यात दरोडेखोर सिध्दार्थ उर्फ सिध्दु जन्मेजाई (37, रा. उल्हासनगर, ठाणे) यास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी नवी मुंबई येथील तुर्भे नाका येथून जेरबंद केले आहे. चाकण व नारायणगाव येथून कोट्यवधी रुपयांच्या सिगारेटची वाहतूक करणारे दोन कंटेनर लांबविण्यात तोच मुख्य सूत्रधार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
कुख्यात जन्मेजाई याच्यावर पुणे जिल्ह्यातील चाकण आणि नारायणगाव पोलीस ठाण्यासह कल्याण, परतूर, कोतवाली, ठाणे, संगमनेर आदी पोलीस ठाण्यांसह परराज्यातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील काही महिन्यांपासून कुख्यात जन्मेजाई याच्या मागावर पुणे ग्रामीण पोलीस, रायगड पोलीस, ठाणे पोलीस, ए.टी.एस.मुंबई पोलीस होते. चाकण शिक्रापूर रस्त्यावर मागील महिन्यात रासे ( ता. खेड ) हद्दीत रात्रीच्या वेळी एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मोटारीतून अज्ञात चोरटे आले. शिक्रापूर येथील एका कंपनीतून सिगारेट घेऊन जाणारा ट्रक अडवून 8 कोटी रुपये किंमतीचे ब्रिस्टॉलचे सिगारेटचे बॉक्स ट्रकसह लंपास केला. त्याचा मास्टर माइंड कुख्यात जन्मेजाई हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.


नवी सांगवीत घरफोडी करून दागिने लंपास

पुणे । नवी सांगवी मधील बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरटयांनी लंपास केले. ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघकीस आली. नितीन कागडा (31) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागडा परिवारातील सर्वजण कामानिमित्त शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास बाहेरगावी गेले. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले 68,500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरटयांनी चोरून नेले. सकाळी दहाच्या सुमारास कागडा परिवार बाहेरगावाहून परत घरी आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये पहिले असता लोखंडी कपाटात दागिने नसल्याचे समजले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -