घरमहाराष्ट्रटँकरची योग्य आकडेवारी जाहीर करा- केशव उपाध्ये

टँकरची योग्य आकडेवारी जाहीर करा- केशव उपाध्ये

Subscribe

उन्हाळ्यात लागणारे पाण्याच्या टँकर्सती योग्य आकडेवारी जाहीर करण्याची मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.

महाराष्ट्राची बदनामी करण्याची एकही संधी सचिन सावंत सोडत नसून, भाजपा सरकारच्या सर्वच क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे भ्रामक आकडेवारी देऊन माध्यमांची आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे. टँकरची आकडेवारी देताना तर त्यांनी कहरच केला. मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील टँकर्सची आकडेवारी त्यांनी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते. ज्या संकेतस्थळावरून त्यांनी ती आकडेवारी घेतली, तेथूनच मे महिन्यातील आकडेवारी त्यांनीच जाहीर करावी,असे आव्हान भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

अशी आहे आकडेवारी

पाण्याची तीव्र टंचाई ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असते. पावसाची टक्केवारी आणि त्यानंतरच्या उन्हाळ्यात लागणारे टँकर्स अशी ही आकडेवारी द्यायची सोडून ‘आली लहर…’ या थाटात सोयीची आकडेवारी मांडायची आणि स्वत:चे अपयश झाकायचे, असा त्यांचा सध्याचा दिनक्रम आहे. वस्तुत: मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील टँकर्सची स्थिती पाहिली तर जलयुक्त शिवार कसे यशस्वी अभियान आहे, हेच स्पष्ट होते, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
२०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडून सुद्धा २३२२ टँकर्स लागले होते. २०१४ मध्ये ७० टक्के पावसात 2358 टँकर्स लागले होते. जणू टँकर्सची ठरलेली लॉबी त्या सरकारने पोसून ठेवली होती. २०१५ मध्ये अवघा ५९ टक्के पाऊस झाला आणि ५४२३ टँकर्स या वर्षांत लावावे लागले. दरम्यान, २०१५ च्याच पावसाळ्यात जलयुक्त शिवारच्या कामांना वेग आला. त्याचा परिणाम असा झाला की, २०१६ च्या मे महिन्यात अखेरच्या आठवड्यात ९५ टक्के पाऊस पडूनही केवळ १३४३ टॅकर्स लावावे लागले. २०१७ मध्ये तर अवघा ८४ टक्के पाऊस पडला, तरी सुद्धा मे महिन्याच्या अखेरीस केवळ १०४७ टँकर्स लावावे लागले. थोडक्यात काय तर काँग्रेसच्या काळात १०९ टक्के पाऊस पडूनही २३२२ टँकर आणि भाजपाच्या काळात ८४ टक्के पाऊस पडूनही १०४७ टँकर असेच चित्र आहे.

- Advertisement -

मानसिक स्थिती तपासून घेण्याचा सल्ला

सातत्याने अशी आकडेवारी पुढे करणाऱ्या सचिन सावंतांनी एकदा आपली मानसिक स्थिती तपासून घ्यावी, असा सल्ला देतानाच सातत्याने चांगली आकडेवारी मांडण्याची संधी ते देत असल्याबद्दल केशव उपाध्ये यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -