घरगणपती उत्सव बातम्याकोरोनाच्या विघ्नासमोर छोट्या गणेश मूर्तींची मागणी वाढली!

कोरोनाच्या विघ्नासमोर छोट्या गणेश मूर्तींची मागणी वाढली!

Subscribe

दर वर्षी मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून घरगुती  गणपती बसविणार्‍या मुंबईकरांमध्ये बाप्पांच्या मूर्तीवर आणि सजावटीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याकडे कल असतो. मात्र यंदा कोरोनाची पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यावर्षी कोरोनाचे  विघ्न टाळण्यासाठी छोट्या मूर्तींची मागणी वाढली आहे. त्यानुसार बाप्पांच्या आगमनापूर्वींपासून नागरिक बाजारातून या छोट्या मूर्तीला घरी घेऊन जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

छोट्या बाप्पांच्या मूर्तीची कमतरता

गेल्या चार महिन्यांपासून देशासह विश्वभरातील कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहे. तसेच अनेक उद्योगांवर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे मूर्ती बाजाराला सुध्दा याचा मोठा फटका बसला आहे. तसेच अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे यंदा घरगुती गणपती सुध्दा साधेपणात साजरा करण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला आहे. तसेच चित्र मूर्ती बाजार दिसून येत आहे. दरवर्षी घरगुती बाप्पांची उंची 1 ते 3 फुटांची असते. मात्र यावर्षी मुंबईकर साधेपणात गणेशोत्सव साजरा करणार असल्यामुळे छोट्या मूर्तींची मागणी वाढली आहे. छोट्या बाप्पांच्या मूर्तीमध्ये 6 इंच, 8 इंच आणि 9 इंचाच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे बाजारातून छोट्या बाप्पांच्या मूर्तीत आता कमतरता जाणवत आहे. लालबागमधील श्री आर्टसचे राजेश सावंत यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, प्रत्येक वर्षी घरगुती गणपतीची ऑर्डर एक दोन महिन्यांपूर्वीपासून आमच्याकडे येत होती. मात्र यंदा ऑर्डर देणार्‍यांची संख्या घटली आहे. आता अनेक नागरिक 1 ते 2 फुटांची मूर्तीची मागणी न करता छोट्या 6 ते 8 इंचाच्या मूर्तीची मागणी करत आहे. त्यामुळे आमच्या उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे.

- Advertisement -

आर्थिक काटकसर

गणेशभक्त पनणकुमार प्रसाद यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाची स्थापना करतोय. यंदा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यंदा सहा इंचाची मूर्ती बसवून घरी विसर्जन करण्याचे आम्ही ठरवले आहे. सागर येवले यांनी सांगितले की, कोरोनामुळे गेली चार महिने हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक काटकसर करून कोरोना संसर्गाला लक्षात घेऊन आम्ही 8 इंचाची मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मी दरवर्षी अडीच फुटांची मूर्ती बसवितो. मात्र यंदा छोटी मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करणार आहे.

छोट्या मूर्ती, किमती वाढल्या

यंदाची परिस्थिती लक्षात घेता अनेक नागरिक छोटी मूर्ती मिळावी म्हणून अगोदरच बाप्पांची मूर्ती घेऊन जात आहे. तसेच अनेक मूर्तीकारांकडे दर वर्षीप्रमाणे छोट्या मूर्तींची संख्या कमी असतात. आता कोरोनामुळे छोट्या मुर्तीची मागणी वाढल्याने छोट्या मूर्तींच्या किंमतीही महागल्या आहेत. साधारणत: 6 इंचाची मूर्ती किंमत 150 रुपये आहे. ती किंमत आता 250 रुपये इतकी झाली आहे. तसेच 8 इंचाची मूर्ती 250 रुपये आहे ती आता 350 रुपयांवर पोहोचली असल्याचे बाजारात दिसून येत आहे.
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -