घरमहाराष्ट्रआगामी सर्वच निवडणुका जिंकणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी सर्वच निवडणुका जिंकणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई – आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणार आहोत. वास्तविक, गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने मी राजकारणावर अधिक बोलणार नाही. मात्र, तुम्ही नको ते प्रश्न विचारता व उत्तरे न दिल्यास तुम्ही उलट बातम्या दखवता. आज अनंत चतुर्दशी असल्याने गणपती बाप्पाला विंनती आहे की, येते वर्ष कोणतेही विघ्न न येता पार पडावे. त्यामुळे आज राजकीय बोलणे नको, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्या सरकारनेच मुंबईत बॉम्ब स्फोट करणाऱ्या आतंकवाद्याला न्यायालयात जाऊन रात्री खटला चालवून फासावर लटकावले आहे. तसेच, मुंबईत बॉम्ब स्फोट करणाऱ्यांना कोण संरक्षण देते ते मंत्री आज तुरुंगात आहेत.

- Advertisement -

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांची उपस्थिती –

गिरगाव चौगिरगाव चौपाटीवरपाटीवर दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सायंकाळी ७.४४ ते ७.५१ या कालावधीत एकामागोमाग एक आगमन झाले. यावेळी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही अवधीतच व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही गिरगाव चौपाटीवर उपस्थिती दर्शवली. त्यानंतर, या सर्व मान्यवरांनी मुंबईतील मुख्य आकर्षण असलेल्या मोठ्या व आकर्षक गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली व गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -