घरताज्या घडामोडीभाजपचा २०२४ लोकसभा निवडणुकीचा मास्टर प्लान तयार, १५ राज्यात प्रभारी नियुक्त, महाराष्ट्राच्या...

भाजपचा २०२४ लोकसभा निवडणुकीचा मास्टर प्लान तयार, १५ राज्यात प्रभारी नियुक्त, महाराष्ट्राच्या चार नेत्यांचा समावेश

Subscribe

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मास्टर प्लान आखला आहे. या प्लान अंतर्गत भाजपने १५ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मास्टर प्लान आखला आहे. या प्लान अंतर्गत भाजपने १५ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपने टि्वटवर ही माहिती दिली आहे. या सर्व नियुक्त्या भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केल्या आहेत.

त्यानुसार बिप्लब कुमार देव हरियाणाचे प्रभारी, ओम माथुर छत्तीसगडचे प्रभारी असणार आहेत. तर लक्ष्मीकांत वाजपेयीकडे झारखंडचे प्रभारीपद देण्यात येणार आहे. मंगळ पांडे पश्चिच बंगालचे प्रभारी, विजय रूपाणी पंजाब चंदीगढचे प्रभारी , राधामोहन अग्रवाल लक्षद्वीपचे प्रभारीपद, महेश शर्मा त्रिपुराचे प्रभारी, संबित पात्रा यांच्यावर ईशान्येकडील राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेलंगणाचे प्रभारी तरुण चुघ , तर पी. मुरलीधर राव यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात येणार आहे, तसेच अरूण सिंह राजस्थानचे प्रभारी असणार आहेत.

- Advertisement -

नितीन नबीन छत्तीसगढचे सहप्रभारी, डॉ. राधामोहन अग्रवाल केरळचे सहप्रभारी, डॉ. रमाशंकर कठेरिया मध्यप्रदेशचे सहप्रभारी, हरिश द्विवेदी बिहारचे सहप्रभारी असतील. अरविंद मेनन तेलंगणाचे सहप्रभारी, अमित मालवीय आणि आशा लकडा पश्चिम बंगालचे तसेच नरिंदर सिंह रैन पंजाबचे सहप्रभारी, रितुराज सिन्हा ईशान्येकडील राज्यांचे सहप्रभारी असणार आहेत.

तसेच यात महाराष्ट्रातील चार बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आलं आहे. माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारी असणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांवर केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मध्यप्रदेश सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -